मुंबई : गोवारी हत्याकांड झाला होता तेव्हा मंत्र्यांनी राजीनामा दिला होता का ? मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाबाबत वटहुकूम काढला होता का ? असे सवाल करीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून राजकारणी नेत्यांना सुनावलंय. त्यावर आता राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी फडणवीसांना कडक इशारा दिला आहे.
हेही वाचा…टरबूज पायाखाली तुडवत मराठा संघटनेकडून निषेध, फडणवीसांच्या विरोधात जोरदार घोषणा
महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा आरक्षण मिळालं नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस करताय आणि त्या सरकारमधील दोन वजनदार मंत्री त्यांच्याच शेजारी बसून मुकाट्याने हे ऐकताय. कोणत्या पातळीची मजबुरी असेल त्यांची समजून घ्या. असं म्हणत जगताप यांनी फडणवीसांना डिवचलं. तसेच ज्यांच्यावर लाठीमार झाला ती हाडामांसाची माणसं होती. खेळण्यातल्या बाहुल्या नव्हत्या. तुमचा उद्देश जर स्वच्छ असेल तर राजीनामा द्या, माफीनामा नको. असंही त्यांनी म्हटलय.
हेही वाचा…“..त्यामुळे एका क्षणात राजकारणात प्रवेश केला,” राजकारणात येण्यापुर्वीचा पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान, फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी आज सुरक्षारक्षक न घेता राज्यातल्या कोणत्याही रस्त्यावर फिरून दाखवावे. शक्य नसेल तर आपण गृहमंत्री पदासाठी लायक नाही असे स्वतःच जाहीर करून राजीनामा द्यावा. असं आवाहन देखील त्यांनी दिलंय. काही लोक आंदोलनाआडून राज्याची शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत. असं एकनाथ शिंदे असं म्हणातेहत परंतु ते ‘काही लोक’ आज पत्रकार परिषदेत तुमच्याच सोबत बसले होते असंही त्यांनी म्हटलंय.
फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी आज सुरक्षारक्षक न घेता राज्यातल्या कोणत्याही रस्त्यावर फिरून दाखवावे. शक्य नसेल तर आपण गृहमंत्री पदासाठी लायक नाही असे स्वतःच जाहीर करून राजीनामा द्यावा.
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) September 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…वडिल लोकसभेवर गेले तर लेकींच्या राजकीय पदार्पणाचा मार्ग सोपा, नांदेडचं राजकीय गणित काय?
हेही वाचा…“मराठा समाजाने आता संयम बाळगावा, सरकार मराठा समाजाच्या पाठीशी”, एकनाथ शिंदेंचं आंदोलकांना आवाहन
हेही वाचा…“लाठीचार्जचे आदेश वरिष्ठांनी दिले सिद्ध करा, तुम्ही सांगाल ते..,” अजित पवारांनी विरोधकांना दिलं खुलं चॅलेंज
हेही वाचा…लाठीचार्जवरून देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी, तर विरोधकांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर उद्धव ठाकरे”, चित्रा वाघ यांची टिका