मुंबई : हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काॅंग्रेसला गाडण्याचा विचार मांडला. ज्या मैदानाताून प्रखर हिंदुत्वाचा जागर केला. त्याच मैदानातून काॅंग्रसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याबाबत भाष्य केलंय.
हेही वाचा…महाराष्ट्राच्या तळागाळातून ठाकरेंना पाठिंबा, मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन
दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदानासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. यातून शिंदे गटाने माघार घेतली आहे. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल. कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? असा खोचक सवालही त्यांनी केलीय.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना लगावला टोला, म्हणाल्या, अहो चित्राताई, अगोदर..,
दरम्यान, बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? असा टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…आमदार अपात्रतेची सुनावणी एक दिवस आधीच होणार, मोठं कारण आलं समोर
हेही वाचा…“तेव्हा महाराष्ट्रात दोनच नेत्यांनी काॅंग्रेसच्या विरोधात रान पेटवलं होतं”, सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“धंगेकरांचा पारा चढला..! अन् थेट ससून रूग्णालय गाठून ‘या’ प्रकरणाबाबत ससून रूग्णालय प्रशासनाला धरले धारेवर
हेही वाचा…“तेव्हा पंकजाताई अनेकवेळा पवारसाहेबांना भेटायला यायची”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
हेही वाचा…चर्चेत असलेले गोगावले मंत्रीपद सोडून शिंदेंना साथ का देताहेत ? गोगावलेंनीच सांगितलं कारण