मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने 128 जागांवर आघाडी घेतली असून सत्ता स्थापन केला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपला या निवडणुकीत दारूण पराभवाचा सामाना करावा लागला आहे. यातच कर्नाटकात राजकीय घटनांना वेग आला असून काॅंग्रेसच्या उमेदवारांना बंगळरूत हालवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“मोदींच्या तब्बल १९ जाहीर सभा, ७ रोड शो,” तरीही कर्नाटकात भाजपला दणका, काॅंग्रेस सरकार स्थापन करणार ?
कर्नाटकच्या जनतेने लाथा हाणून बाहेर काढल्यावरही भाजपवर जनतेचा विश्वास आहे, असे म्हणणे सर्वात मोठा जोक केशव उपाध्ये करतांना दिसत आहे. कर्नाटकामध्ये २२४ आमदारापैकी १३० जागावर काॅंग्रेसची दणदणीत मुसंडी, तर भाजप ६६ जागावर सिमित आहे. कर्नाटकात ८४ % हिंदू व फक्त १२ % मुस्लिम आहेत. भाजपचे मुस्लिमद्वेषी हिंदूत्व हिंदू जनतेने नाकारले. सर्वधर्मसहीष्णुतेचे हिंदूत्व हिंदूनी स्विकारले, धर्मापेक्षा विकासाला मतदारांनी महत्व दिले असं अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ..!मोदी-शाहांना जनतेने झिडकारलं, काॅंग्रेस बहुमताच्या दिशेने
दरम्यान, देशभरातील राज्यराज्यातून आणलेल्या पेट्या कर्नाटकमध्ये चालल्या नाहीत. लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते. पैसा व विषारी जातीयवाद जनता लाथाडते, कर्नाटकच्या आजच्या निकालानंतरहे सिद्ध होत आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मेहनत घेतली तर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील भाजपची घाण साफ होईल. जय बजरंग बली असं म्हटलं आहे.
कर्नाटक -२२४ आमदारापैकी १३० जागावर काँग्रेसची दणदणीत मुसंडी, तर भाजपा ६६ जागावर सिमीत.८४ % हिंदु व फक्त १२ % मुस्लिम कर्नाटकात आहेत,
भाजपाचे मुस्लीमद्वेषी हिंदुत्व हिंदु जनतेने नाकारले
सर्वधर्मसहीष्णुतेचे हिदुत्व हिंदुनी स्विकारले
४) धर्मापेक्षा विकासाला मतदारांनी महत्व दिले.— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 13, 2023
कर्नाटकच्या पराभवावर बोलताना भाजपचे प्रवक्ते केशवजी उपाध्ये यांची अवस्था “गिरे भी तो टांग उपर” अशीच झालेली आहे 😄 कर्नाटकच्या जनतेने लाथा हाणून बाहेर काढल्यावरही भाजपवर जनतेचा विश्वास आहे असे म्हणणे म्हणजे सर्वात मोठा जोक केशवजी उपाध्ये करताना.😄
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…किशोर आवारेंची हत्या, सुनील शेळकेंनी आरोप फेटाळले, चौकशीला तयार, सुत्रधार शोधा
हेही वाचा…कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल..! “द्वेषाचं दुकान फार काळ चालणार नाही, हा मोदीजींचा पराभव”
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’ – फडणवीसांची उपस्थिती, महेश लांडगेंची वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल
हेही वाचा…“महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मेहनत घेतली, तर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील भाजपची घाण साफ होईल”
हेही वाचा…निपाणीत कुणाचं पार्सल परत जाणार, शरद पवार की फडणवीस, ? राष्ट्रवादी अन् भाजपात काटे की टक्कर