पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे भरदिवसा हत्या झाल्याने एकच खबळबळ उडाली आहे. जनसेना विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरच प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ व्यक्त केली आहे. याच प्रकरणी आता मावळचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यावर आता सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ..!मोदी-शाहांना जनतेने झिडकारलं, काॅंग्रेस बहुमताच्या दिशेने
किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर सुनील शेळके नॉट रिचेअब असल्याच्या बातम्या काल चालवण्यात आल्या. या प्रकरणात आरोपींची चौकशी पोलीसांकडून केली जात आहे. मागील काही दिवसापुर्वी किशोर आवारे यांच्यासोबत आम्ही राजकारणार एकत्रित काम केलं आहे. त्यांच्यात विचारांत मतभेद होते परंतु मनभेद नव्हते. परंतु काही लोकांकडून जाणीवपुर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुनील शेळके यांनी सांगितलं आहे. याप्रकरणात जे काही सत्यता आहे ती बाहेर येईल. त्यामुळे या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. असंही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…पुण्यात भरदिवसा हत्या..! राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल, परिसरात हळहळ व्यक्त
या घटनेनंतर माझा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह माझयावर तक्रार दाखल करण्यात आली. अन् या तक्रारीत किशोर आवारे यांच्या हत्येचा कट रचण्यात आलं आहे. असं सांगण्यात आलं. तक्रार दाखल करतांना त्यांच्या कुटुंबीयाची भावना काय असते ती समजून आहे. परंतु तक्रार दाखल करण्यामागे याचे सुत्राधार कोण आहेत. हे पुढील काळात याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू. तसेच आम्ही विकासाचं राजकारण केलं आहे. असं घाणरेड राजकारण कधीही करणार नाही. असं म्हणत सुनील शेळके यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा…काॅंग्रेसचे दोन्ही नेते आपांसात भिडले, पटोले- वडेट्टीवार मधील ‘ते’ प्रकरण कारणीभूत
दरम्यान, मला लोकांनी कामांसाठी, विकासासाठी निवडून दिलं आहे. राजकारणापासून आलिप्त होण्याचं असेल तर आज होईन. परंतु बदनाम करून तुम्ही मला आलिप्त करण्याचा प्रयत्न करत असाल तर असले आरोप कधीही स्विकारणार नाही. अन् याप्रकरणात कुठलीही चौकशी करण्यासाठी मी तयार आहे. माझी चौकशी करा. तसेच या प्रकरणात कोण राजकारण करत आहे. त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. असंही सुनील शेळके यांनी म्हटलं आहे. माझा भाऊ मला आर्थिक पाठबळ देतो, मला मदत करतो. त्याला देखील बदनाम करण्याचं काम करण्याचं केलं तर याद रखा. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल..! “द्वेषाचं दुकान फार काळ चालणार नाही, हा मोदीजींचा पराभव”
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’ – फडणवीसांची उपस्थिती, महेश लांडगेंची वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल
हेही वाचा…“महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मेहनत घेतली, तर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील भाजपची घाण साफ होईल”
हेही वाचा…निपाणीत कुणाचं पार्सल परत जाणार, शरद पवार की फडणवीस, ? राष्ट्रवादी अन् भाजपात काटे की टक्कर
हेही वाचा…“मोदींच्या तब्बल १९ जाहीर सभा, ७ रोड शो,” तरीही कर्नाटकात भाजपला दणका, काॅंग्रेस सरकार स्थापन करणार ?