मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारून पराभव होण्याच्या मार्गावर आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून आतापर्यंत १२५ जागांवर काॅंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप ७०, जेडीएस २२ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ केला आहे. यातच निपाणी मतदारसंघात काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार लढत होत आहे.
हेही वाचा…“तर शरद पवार पंतप्रधान झाले असते, आजही परिस्थिती बदलली तर ते होऊ शकतात, “
निपाणी मतदार संघ महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात चर्चेत विषय ठरला होता. राष्ट्रवादीने निपाणी मतदार संघात उत्तमराव पाटील यांना उमेदवारी दिली. तर भाजपकडून शशिकला जोल्हे, तर काॅंग्रेसने काकासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना डिवचलं होतं. तर त्यावर शरद पवारांनी देखील फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
हेही वाचा…१०० कोटी प्रकरणातील परमबीर सिंहंचं निलंबन मागे घेण्याचं फडणवीसांनी सांगितलं कारण
साडेतीन जिल्ह्याचा पक्ष याठिकाणी काय करणार, ते पार्सल महाराष्ट्रात परत पाठवून द्या. असं फडणवीसांनी म्हटलं होतं. तर निपाणीत जाऊन राष्ट्रवादीचं पार्सल काय आहे? हे सांगणार असं शरद पवारांनी म्हटलं होतं. यातच सकाळी बारापर्यंत या मतदार संघात भाजपच्या शशिकला जोल्हे 28756, तर राष्ट्रवादीचे उत्तमराव पाटील यांना 28497 मत मिळाली असून या दोन्ही उमेदवारांमध्ये अगदी कमी म्हणजे 259 मताचा फरक बघायला दिसत आहे. त्यामुळे निपाणीत कोण किंगमेकर ठरणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“…तर मोदींनी हे करावे, म्हणजे ईडीचा वेळ अन् देशाचा खर्च वाचेल”
दरम्यान, निपाणी मतदार संघात काॅंग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांना १९, १५६ मत मिळाली आहेत. तर भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आलटून पालटून आघाडी घेत आहे. यातच राष्ट्रवादीचे कर्नाटकात दोन उमेदवार विजयी झाले तर त्यांना पुन्हा एकदा निवडणुक आयोग राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी देखील याकडे लक्ष ठेऊन आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींच्या तब्बल १९ जाहीर सभा, ७ रोड शो,” तरीही कर्नाटकात भाजपला दणका, काॅंग्रेस सरकार स्थापन करणार ?
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ..!मोदी-शाहांना जनतेने झिडकारलं, काॅंग्रेस बहुमताच्या दिशेने
हेही वाचा…पुण्यात भरदिवसा हत्या..! राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल, परिसरात हळहळ व्यक्त
हेही वाचा…काॅंग्रेसचे दोन्ही नेते आपांसात भिडले, पटोले- वडेट्टीवार मधील ‘ते’ प्रकरण कारणीभूत
हेही वाचा…समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, आघाडीच्या काळातील ‘दोन’ प्रकरणात आज मोठी घडामोड