पुणे : ललित पाटील ड्रग्जप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आणखी एक पुरावा समोर आणला आहे. ललित पाटील याच्यावर ससून रूग्णालयात वार्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत असणाऱ्या कैदी रूग्णांची यादी जाहिर केली असून त्याच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टराच्यावर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा…“जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका,” आणखी एका मराठा तरूणाने संपवलं जीवन
सुषमा अंधारे यांनी ससून रूग्णालायातील रजिस्टरमध्ये उल्लेख केलेल्या नोंदीचा फोटो ट्विट केला आहे. यामध्ये वार्ड नंबर १६ मध्ये उपचार घेत असणाऱ्या कैदी रूग्णांची यादी दाखवली आहे. यामध्ये स्पष्ठपणे ललित पाटील याच्यावर हर्नियाच्या आजारासाठी डीन संजीव श्याम ठाकुर यांनी उपचार केल्याचे दिसत आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपले काय मत आहेत ? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
हेही वाचा…मोदींचं अजित पवारांकडून कौतूक अन् नंतर लगेचच मोदींनी शरद पवारांवर साधला निशाणा
दरम्यान, ड्रग्जमाफिया ललित पाटील पलायन प्रकरणी महिला पोलीस शिपाई सविता हनुमंत भागवत निलंबित केले आहे. वार्ड क्रमांक १६ मध्ये बंदोबस्त कामी हजर असताना एका संशयित इसमाने काळ्या रंगाच्या बॅगमधून मोबाईल फोन दिले होते. त्यामुळे कामात हलगर्जीपणा केल्याने महिला पोलिस सविता भागवत यांच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.
ही ससून हॉस्पिटल मधल्या वार्ड नंबर 16 मध्ये उपचार घेत असणाऱ्या कैदी रुग्णांची यादी आहे यात स्पष्टपणे ललित पाटील वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव SST अर्थात संजीव श्याम ठाकुर असे लिहिले आहे.
@Dev_Fadnavis आता आपले काय म्हणणे आहे? @AUThackeray @ShivSenaUBT_ @rautsanjay61 pic.twitter.com/ToBSUEcBN5— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) October 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तीच लोकं आज बघ्याच्या भूमिकेत गप्प राहिली, दुख वाटलं”, शरद पवारांच्या टिकेनंतर आव्हाडांचा अजित पवारांना टोला
हेही वाचा…माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हेही वाचा…मोठी बातमी..! १७ हजार कोटींचा डायमंट मार्केट मुंबईतून गेला सुरतला, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदेंवर केली जोरदार टिका
हेही वाचा…“पक्ष फुटीचा काॅंग्रेसला मोठा फायदा,” राष्ट्रवादी, मनसे आणि वंचितच्या ‘या’ नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश
हेही वाचा…शरद पवारांच्या ‘या’ एकनिष्ठ कार्यकर्त्याने साथ सोडली, शिवबंधन बांधून ठाकरे गटात केला प्रवेश