अहमदनगर : महाराष्ट्रातील एक नेते देशात कृषीमंत्री असतांना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. कृषीमंत्री असतांना शेतकऱ्यांना एमएसपीचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अडचण येत होती. त्यांचा वैयक्तितरित्या सन्मान करतो. परंतु त्यांच्या काळात शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे.
हेही वाचा…मोदींचं अजित पवारांकडून कौतूक अन् नंतर लगेचच मोदींनी शरद पवारांवर साधला निशाणा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी शरद पवारांचं कौतूक करत असतांना नरेंद्र मोदी यांचा एक जूना व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात किती हा विरोधाभास असं म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे. तर तेच ट्विट करत पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा पाठा वाचून आमदार, मंत्री झालेत. तीच लोक आज केवळ सत्तेच्या लालसेपोटी, बघ्याच्या भूमिकेत राहून गप्प बसली असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
हेही वाचा…आता सर्व महिलांना मिळणार मोफत मोबाईल, ‘या’ जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टिका केली. त्यावेळी व्यासपीठावर अजित पवार देखील बसले होते. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी यावरून दु : ख व्यक्त केलं आहे. शेतकऱ्यांच्याबाबत मोदींनी बोलावं, हा देखील मोठा विनोद आहे. वर्षभर शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत ठाण मांडून बसला होता. ७५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा यादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे आमच्या बापाने या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली होती. मात्र काही लोक टिका झाल्यानंतरही बघ्याच्या भूमिका घेऊन गप्प राहिल्याने हे पाहून वाईट आणि दुखही झालं आहे. असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.
खालील व्हिडिओ बघितल्यावर मला वाटतं की,PM साहेबांना आपण आधी काय बोललो आहोत हे लक्षात राहत नसाव.
असो.
पण हे विधान करत असताना आमचे काही जुने साथीदार मंचावर बसले होते.पक्ष फुटीच्या आधी हीच लोक,पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा पाढा वाचून” आमदार,मंत्री झालेत.
तीच लोक आज… https://t.co/rv13a57zYq— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हेही वाचा…मोठी बातमी..! १७ हजार कोटींचा डायमंट मार्केट मुंबईतून गेला सुरतला, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदेंवर केली जोरदार टिका
हेही वाचा…“पक्ष फुटीचा काॅंग्रेसला मोठा फायदा,” राष्ट्रवादी, मनसे आणि वंचितच्या ‘या’ नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश
हेही वाचा…शरद पवारांच्या ‘या’ एकनिष्ठ कार्यकर्त्याने साथ सोडली, शिवबंधन बांधून ठाकरे गटात केला प्रवेश
हेही वाचा…“जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका,” आणखी एका मराठा तरूणाने संपवलं जीवन