अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यामुळे एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्व कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी विविध पक्षात काम केलं असून केंद्रात तसेच राज्यात अनेक मंत्रीपद भुषवली आहेत.
हेही वाचा…आता सर्व महिलांना मिळणार मोफत मोबाईल, ‘या’ जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
अहमदनगर येथील अकोला येथे १० नोव्हेंबरला त्यांचा जन्म झाला होता. १९७८ मध्ये बबनराव ढाकणे यांनी विधानसभेची निवडणुक लढवली आणि त्यात ते विजयी झाले होते. त्याच वर्षी त्यांना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर १९७९ मध्ये त्यांनी ग्रामविकासमंत्री पदाचीही शपथ घेतली.
हेही वाचा…नाशिक लोकसभा जागेसाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली, तरीही शिंदेंचा ‘हा’ उमेदवार लढणार
पुढे १९७९ ते १९८१ मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तर १९८१ मध्ये राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर १९८५ मध्ये पुन्हा आमदार म्हणून त्यांची निवड झाली. तर १९८८ मध्ये विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर १९८९ बीड लोकसभा निवडणुक लढवून त्यांची केंद्रात वर्णी लागली. केंद्रात त्यांना १९९० मध्ये राज्यमंत्री पद देण्यात आले होते.
हेही वाचा…मोदींच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या निळवंडे धरणाचा इतिहास काय ? वाचा सविस्तर
जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काॅंग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी काॅंग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले होते. यासोबत उस तोडणी कामगरा, शेतकरी, बेरोजगारी अशा विविध विषयांना त्यांनी हात घातला होता. दिवंगत ढाकणे यांचा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंत चव्हाण,वसंतराव नाईक, व्ही.पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा त्यांना सहवास लाभला. माझी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळाही त्यांनी पार्थडीत उभा केला. ढाकणे यांच्या मागे मुलगा प्रतापराव ढाकणे, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! १७ हजार कोटींचा डायमंट मार्केट मुंबईतून गेला सुरतला, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदेंवर केली जोरदार टिका
हेही वाचा…“पक्ष फुटीचा काॅंग्रेसला मोठा फायदा,” राष्ट्रवादी, मनसे आणि वंचितच्या ‘या’ नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश
हेही वाचा…शरद पवारांच्या ‘या’ एकनिष्ठ कार्यकर्त्याने साथ सोडली, शिवबंधन बांधून ठाकरे गटात केला प्रवेश
हेही वाचा…“जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका,” आणखी एका मराठा तरूणाने संपवलं जीवन
हेही वाचा…मोदींचं अजित पवारांकडून कौतूक अन् नंतर लगेचच मोदींनी शरद पवारांवर साधला निशाणा