बीड : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही. असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. बीड येथे झालेल्या जाहिर सभेत पंकजा मुंडे यांनी एल्गार पुकारला आहे. तर याआधी ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत गळ्यात फुलांची माळ घालणार नाही. असंही म्हटलं होतं. त्यावर आता मराठा समाजाकडून पंकजा मुंडे यांना घरचा आहेर देण्यात आला आहे.
हेही वाचा…“अजित पवार मनातून बोलत नाहीत, त्यांना…”, एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला
पंकजा ताई स्वत: च्याच स्वार्थी राजकारणासाठी मराठा समाजाच्या भावनेशी खेळ खेळू नका. तुमचं मराठा समाजाबद्दल खरं प्रेम असेल तर ५० टक्के ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी करा. असं खुल आव्हान सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पंकजा मुंडे यांना केला आहे. याआधी मराठा समाजाला आरक्षण हवं आहेच, परंतु त्याचा भावनिक मुद्दा करू नका. अशा कानपिचक्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना दिल्या आहेत.
हेही वाचा…“शरद पवार, हे घ्या..! ‘भोसले’ कुळाचे पुरावे , आणि आता माफी मागा”, तुषार भोसले आक्रमक
दरम्यान, तसेच आपल्याला दुधही पोळलेलं आहे म्हणून आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष इतिहास घडवणारं म्हणजेच इतिहास बदलणारं वर्ष आहे. मला माध्यमांनी विचारलं, तुम्ही आमदार, खासदार, किंवा ग्रामपंचायत सदस्य नाही. मग काय सर्व पक्ष तुम्हाला ऑफर देतात. त्यावर म्हटलं, ते मला माहिती नाही. पण, मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे. म्हणून माझ्याकडे सर्वजण पाहत आहेत. असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा, राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत
हेही वाचा…“साहेबांचं राहिलं स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी आपली, ” विनायक मेटेंच्या पत्नीची फडणवीसांसमोरच मागणी
हेही वाचा…“थोडी तरी माणसात क्रेडिबिलिटी असली पाहिजे”, वरूण सरदेसाईंनी नितेश राणेंना दाखवला बाहेरचा रस्ता
हेही वाचा…नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रीपद जाणार, दिल्लीत झाला शिक्कामोर्तब
हेही वाचा…“विरोधकांची पाटण्याची बैठक ही राहुल गांधींच्या लग्नाची सोयरीक जुळवण्यासाठी होती”, रावसाहेव दानवेंची फटकेबाजी