मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यातील कामगिरी सुमार दर्जाची आहे. त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावं. असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यावर आता एकनाथ शिंदे यांच्याकडून अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा…“संतोष बांगरांना मंत्रिपद मिळालं तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल”
विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्षाला करू द्या, सरकार म्हणून आम्ही आमचं काम करीत आहे. विरोधी पक्षनेते मनातून बोलत नाही तर त्यांना विरोधी पक्ष म्हणून बोलावं लागत आहे. कारण पवार साहेबांनी त्यांचं काय केलं आहे त्याची आठवण त्यांना आहे. शरद पवारांनी अजित पवारांचीच विकेट घेतली आहे. हे त्यांना माहिती आहे. असंही शिंदे म्हणाले.
हेही वाचा…पुढच्या वर्षापर्यंत शिंदे साहेबांची ‘भाजपा’ होईल…! फौजदाराचा हवालदार झालेले ‘फडणवीस’ किती अपमान सहन करणार
दरम्यान, पहाटेच्या शपथविधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या बैठकीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चर्चा झाली होती. परंतु ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेतल्याने अजित पवारांकडे कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर आता पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनीच विकेट टाकली असं शरद पवारांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार, हे घ्या..! ‘भोसले’ कुळाचे पुरावे , आणि आता माफी मागा”, तुषार भोसले आक्रमक
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांना ‘पवार’ नावाच्या पॉवरची किती भीती वाटते”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…“मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…”, बीडच्या सभेतून पंकजा मुंडेंनी पुकारला एल्गार
हेही वाचा…“उद्याचा मुक्काम तुरूंगात असणार हे आदित्य ठाकरेंना…”, संजय शिरसाट यांचं मोठं विधान
हेही वाचा…“माझा भाऊ अन् वडिलांशिवाय राज्यातील राजकारण चालत नाही”,सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला