मुंबई : राज्यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहेत. पहाटेच्या शपथविधीवरून दोन्ही नेत्यांमध्ये टिका टिप्पणी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या चालवल्या जात आहेत. यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांच्या गुगलीने मी नव्हे तर “अजित पवार” क्लीनबोल्ड”, मी गुगली टाकली तर..,” देवेंद्र फडणवीसांचं सुचक वक्तव्य
राज्यात महिल्यांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिल्या भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होत आहेत. परंतु आमचे गृहमंत्री त्यावर बोलत नाहीत. इतर बेरोजगारी, महिला सुरक्षा, महागाई या विषयी बोलयाचं सोडून फडणवीस शरद पवारांबद्दल बोलतात. शरद पवार आणि अजित पवाराचं ऑक्सेशन असून भाजपला दुसरं काही दिसत नाही. त्यामुळेच मी अजित पवारांनी अमिताभ बच्चनची उपमा दिली होती. भाजपला शरद पवाराला आणि अजित पवार यांच्यापुढे काही दिसत नाही. महाराष्ट्राचा देशाचा राजकारण हे जर माझ्या वडिलांनी भावांनी आणि आमच्या नेत्यांशिवाय चालत नसेल तर याच्यापेक्षा मोठी कॉम्लिमेंट ही राष्ट्रवादी काॅंग्रेसला पोहचलीच नाही. असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.
हेही वाचा…राज्यात “शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस” सामना…! वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप, राजकारण तापलं
दरम्यान, पहाटेच्या शपथविधीत शरद पवारांचाही हात होता, त्यांच्यासोबत बैठक पार पडली होती. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर त्यांनीच विकेट टाकली तर मी काय करणार, मी गुगली फेकली असं शरद पवार म्हणाले त्यावरून राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“संतोष बांगरांना मंत्रिपद मिळालं तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल”
हेही वाचा…पुढच्या वर्षापर्यंत शिंदे साहेबांची ‘भाजपा’ होईल…! फौजदाराचा हवालदार झालेले ‘फडणवीस’ किती अपमान सहन करणार
हेही वाचा…‘राहुल शेवाळे, किर्तीकर, भावना गवळी की श्रीरंग बारणे,’ केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार ?
हेही वाचा…१ जुलैपुर्वी जवळचा निकवर्तीय आदित्य ठाकरेंची साथ सोडणार, युवा सेनेचा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…केंद्रात शिंदे गटाला २ मंत्रिपद, तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात? कुणाला संधी, कुणाची वर्णी ?