मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काल पंढरपुर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यात निवडणुका आणि मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली असून केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…मुलीसाठी बाप सरसावरला..! “ती स्वत:च कर्तृत्वाने निवडून आलीय,” शरद पवारांचं मोदींना प्रत्यु्त्तर
2024 च्या लोकसभेपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या विस्तारात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळण्याचा अंदाज असून यात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. यातच मंत्रिपद कुणाला द्यायचं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे.
हेही वाचा…“माझ्या गुगलीवर फडणवीसांनी विकेट टाकली,” फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवारांचा टोला
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपच्या दोन मंत्र्यांना डच्चू देऊन शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये शिंदे गटातील लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, भावना गवळी यांचं नाव चर्चेत आहे. याचसोबत प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांचं देखील नाव चर्चेत आहे. यातच एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्री पद मिळणार असून एक ग्रामीण तर एक शहरी भागाला देण्यात येणार आहे.
हेही वाचा…“नाशिकमध्ये पहिला लढा ठाकरेंनी जिंकला, शिंदे गटाला कोर्टाचा मोठा दणका दिला”
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्यमंत्रिमंडळाचाही विस्तार होण्याची शक्यता आहे. यातच शिवसेनेच्या चार मंत्र्यांना डच्चू तर केंद्रातील दोघांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा खासादर संजय राऊत यांनी केला आहे. पुढील आठवड्यामध्ये राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं संजय शिससाठ यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…१ जुलैपुर्वी जवळचा निकवर्तीय आदित्य ठाकरेंची साथ सोडणार, युवा सेनेचा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…केंद्रात शिंदे गटाला २ मंत्रिपद, तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात? कुणाला संधी, कुणाची वर्णी ?
हेही वाचा…“शरद पवारांच्या गुगलीने मी नव्हे तर “अजित पवार” क्लीनबोल्ड”, मी गुगली टाकली तर..,” देवेंद्र फडणवीसांचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…राज्यात “शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस” सामना…! वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप, राजकारण तापलं
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्राने गुंतवणुकीत पुन्हा नंबर १ पटकावला”