पुणे : राज्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून वर्षपुर्ती होत आहेत. मात्र अद्यापही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यातच आता मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यातच मला मंत्रिमंडळ विस्तारात १०० टक्के स्थान मिळणार असा दावा शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टोला लगावला आहे.
हेही वाचा…राज्यात “शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस” सामना…! वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप, राजकारण तापलं
संतोष बांगरांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद मिळालं तर महाराष्ट्रामध्ये मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल. असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी बांगरांना लगावला आहे. तसेच सध्याच्या सरकारइतकं अपयशी सरकार राज्यात कधीच राहील नाही. राज्यात भ्रष्ट्राचार सुरू आहे. शेतकऱ्यांचे कोणतंही काम होत नाही. शेतकर्यांवर अन्याय होत आहे. अतिवृष्टीची मदत देखील अद्याप झाली नाही. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं सरकार आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्राने गुंतवणुकीत पुन्हा नंबर १ पटकावला”
मराठवाड्यातील नेता आम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचा असल्याचं अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यामुळे मला शंभर टक्के मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल. तुम्ही त्याची काहीही काळजी करू नका. असं संतोष बांगर यांनी म्हटले होते. त्यानंतर अंबादास दानवे यांनी संतोष बांगरांना हा टोला लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुढच्या वर्षापर्यंत शिंदे साहेबांची ‘भाजपा’ होईल…! फौजदाराचा हवालदार झालेले ‘फडणवीस’ किती अपमान सहन करणार
हेही वाचा…‘राहुल शेवाळे, किर्तीकर, भावना गवळी की श्रीरंग बारणे,’ केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार ?
हेही वाचा…१ जुलैपुर्वी जवळचा निकवर्तीय आदित्य ठाकरेंची साथ सोडणार, युवा सेनेचा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…केंद्रात शिंदे गटाला २ मंत्रिपद, तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात? कुणाला संधी, कुणाची वर्णी ?
हेही वाचा…“शरद पवारांच्या गुगलीने मी नव्हे तर “अजित पवार” क्लीनबोल्ड”, मी गुगली टाकली तर..,” देवेंद्र फडणवीसांचं सुचक वक्तव्य