मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला आज एक वर्षपुर्ती होत असून त्यानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात आज वर्तमानपत्रात जाहिरीती देखील दिल्या आहेत. मात्र या जाहिरातीवरून आता राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्राने गुंतवणुकीत पुन्हा नंबर १ पटकावला”
शिंदे गटाकडून आज वर्तमानपत्रात जाहिरीतबाजी करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे फोटोसह एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचेही फोटो दिली आहेत. तसेच यात महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व अंमलबजावणी वेगवान, दमदार सरकार शिंदे सरकार अशा आशायची टॅगलाईन वापण्यात आली आहे. यावरून सुरज चव्हाण यांनी शिंदेंना टोला हाणाला आहे.
हेही वाचा…मुलीसाठी बाप सरसावरला..! “ती स्वत:च कर्तृत्वाने निवडून आलीय,” शरद पवारांचं मोदींना प्रत्यु्त्तर
शिंदे-फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती सरकार स्थापनेवेळी शिंदे-फडणवीस सरकार होते. एक वर्षात शिंदे साहेबांनी शिंदे सरकार करून दाखवलं. याच गतीने चालत राहील तर पुढच्या वर्षापर्यंत शिंदे साहेबांची भाजपा होईल. फौजदाराचा हवालदार झालेले फडणवीस किती अपमान सहन करणार असा शाब्दिक हल्लाबोल देखील सुरज चव्हाण यांनी केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती सरकार स्थापनेवेळी ‘शिंदे-फडणवीस’ सरकार होते.एक वर्षात शिंदे साहेबांनी “शिंदे सरकार” करून दाखवलं…याच गतीने चालत राहील तर पुढच्या वर्षापर्यंत शिंदे साहेबांची “भाजपा”होईल.फौजदाराचा हवालदार झालेले फडणवीस किती अपमान सहन करणार. pic.twitter.com/2nxjfqqag7
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) June 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…‘राहुल शेवाळे, किर्तीकर, भावना गवळी की श्रीरंग बारणे,’ केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार ?
हेही वाचा…१ जुलैपुर्वी जवळचा निकवर्तीय आदित्य ठाकरेंची साथ सोडणार, युवा सेनेचा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…केंद्रात शिंदे गटाला २ मंत्रिपद, तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात? कुणाला संधी, कुणाची वर्णी ?
हेही वाचा…“शरद पवारांच्या गुगलीने मी नव्हे तर “अजित पवार” क्लीनबोल्ड”, मी गुगली टाकली तर..,” देवेंद्र फडणवीसांचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…राज्यात “शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस” सामना…! वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप, राजकारण तापलं