बीड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांची आज पहिलीच जंयती साजरी करण्यात आली. बीड येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची खास उपस्थिती होती. तर या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. या कार्यक्रमात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी मेंटेंच राहिलेलं स्वप्न बोलून दाखवलं.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांना ‘पवार’ नावाच्या पॉवरची किती भीती वाटते”, राष्ट्रवादीने डिवचलं
आपलं सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध आहे, असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी उचलून धरला. त्यावेळेस साहेबांवर प्रचंड टीका ही झाली. उपेक्षा अवहेलना सहन करत मराठा आरक्षणाचा जागर केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातला स्मारक असेल ही दोन्ही साहेबांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे आणि मी आपणास सांगते की या बाबतीमध्ये कोणतेही तडजोड होणार नाही करायची देखील नाही, असं विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी सांगितलं.
हेही वाचा…“मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…”, बीडच्या सभेतून पंकजा मुंडेंनी पुकारला एल्गार
ज्योती मेटे यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केले. मराठा आरक्षणाचा विषय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रामध्ये हे दोन विषय विनायक मेटे यांचा श्वास होता. या दोन विषयांपासून ते कधी दूर गेलेच नाही. आपल्याला सांगतो की आपण ज्या प्रकारे सांगितलं विनायकरांचे स्वप्न होतं. मराठा आरक्षण आपलं सरकार हे त्याकरता पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि त्याच्याकरता जे जे करावे लागेल तेथे सगळं करण्याची तयारी आपल्या सरकारची आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“थोडी तरी माणसात क्रेडिबिलिटी असली पाहिजे”, वरूण सरदेसाईंनी नितेश राणेंना दाखवला बाहेरचा रस्ता
हेही वाचा…नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रीपद जाणार, दिल्लीत झाला शिक्कामोर्तब
हेही वाचा…“विरोधकांची पाटण्याची बैठक ही राहुल गांधींच्या लग्नाची सोयरीक जुळवण्यासाठी होती”, रावसाहेव दानवेंची फटकेबाजी
हेही वाचा…“अजित पवार मनातून बोलत नाहीत, त्यांना…”, एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला
हेही वाचा…“शरद पवार, हे घ्या..! ‘भोसले’ कुळाचे पुरावे , आणि आता माफी मागा”, तुषार भोसले आक्रमक