पुणे : सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर महत्वपुर्ण निर्णय दिल्यानंतर आता लवकरतच राज्यात निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालायने येत्या पंधरा दिवसात लगेच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश देखील दिला आहे. आता याच पार्श्वभूमीवर पुण्याचे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
राज्यातील जनतेने मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार पाहिलं आहे. त्या संपूर्ण कालावधीत भ्रष्टाचार घडला. त्यामुळे त्यांचे दोन मंत्री गजाआड झाले आहेत, तर अनेक मंत्री त्याच मार्गावर आहेत. या भ्रष्टाचारी कारभाराला जनता वैतागली आहे. यामुळे येणार्या पुणे महापालिका निवडणुकीत १०० प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे आणि हीच देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची भेट असणार आहे, असे मत भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.
“राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
आज देवेंद्र फडणवीस आज त्यांचा वाढदिवस आहे. आज राज्याच्या आजी माजी उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज पोस्टर, तसेच वर्तमानपत्र, टिव्हीवर कोणत्याही प्रकाराची जाहिरात न देण्याचे भाजपच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने होणारा खर्च हा पुरग्रस्त लोकांनासाठी देण्यात यावा असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. यातच आज अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
“शिवसेनेच्या आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे”; दिपाली सय्यदचा सल्ला
त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत- कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
Read also
- “आढळराव पाटलांची सेनेतून बाहेर पडण्याची वेळ चुकली”; सचिन अहिरांचं वक्तव्य
- “माझ्या हिमंतीवर मी निवडून येतो, मला कुणाची गरज नाही”; शिवाजीराव आढळराव पाटील
- “साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष ही विरोधी बाकावर बसण्यात गेलीत”; आव्हाडांनी सांगितला जुना किस्सा
- “ठाकरेंच्या सेनेला डोकं वर काढायची संधी देऊ नका”; निलेश राणेंचं गंभीर वक्तव्य
- “आदित्य अजून लहान आहे, त्यांनी कंस बोलावं ते उद्धव ठाकरेंकडून शिकावं”