मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत दोन गट पडले असून आता शिवसेनेच्या निवडणुक चिन्हांवरून जोरदार आक्रमक सुरू आहे. यातच आता आदित्य ठाकरे यांच्या विविध ठिकाणी जोरदार जाहीर सभा होत आहेत. या जाहीर सभांमधून आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधत आहेत. यावर आता शिंदे गटातील प्रवक्ते दिपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी गंभीर वक्तव्य केलं आहे.
तर मग केंद्रात जाऊन अमित शहांचे पाय का चाटणार का? कांदेंवर दानवेंचा हल्लाबोल
देव धर्मातून एक गोष्ट शिकलो, शत्रूला कधीही डोकं वर काढायची संधी द्यायची नसते. कंसाला मारायला कृष्णाला आणि रावणाला मारायला रामाला पुढाकार घ्यावा लागला. बगळा किती ही साधा दिसला तरी पण तो पाण्यात शिकार करायला उभा असतो, ठाकरेंच्या सेनेला डोकं वर काढायची संधी देऊ नका. असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेवर राणे कुटुंबीय टिकास्त्र सोडत आहेत. निलेश राणे आदित्य ठाकरेंवर सातत्याने टिका करीत आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे शिवसेना अत्यंत वाईट परिस्थिती मध्ये गेली आहे. अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यावरून आदित्य ठाकरे हे विविध जाहीर सभांमधून बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत.
“शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा उद्धव ठाकरेंनी का सुरक्षा दिली नाही”
आदित्य ठाकरेंना खऱ्या शिवसैनिकांची ओळख कशी असले, ते भेटेल असतील तर त्यांना खरा आणि खोटा शिवसैनिक माहिती असेल. उद्या राष्ट्रवादीचा एखादा माणूस आला तीर ते त्याला शिवसैनिकच म्हणणार, असे म्हणत दिपक केसरकरांनी नाशिकच्या गर्दिचा उल्लेख केला. तसेच आदित्य ठाकरे असून लहान आहे. त्यांनी कोणाबद्दल कसं बोलावं ते उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकावं असा सल्ला देखील दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.
Read also
- “आदित्य अजून लहान आहे, त्यांनी कंस बोलावं ते उद्धव ठाकरेंकडून शिकावं”
- “राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
- “राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
- “शिवसेनेच्या आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे”; दिपाली सय्यदचा सल्ला
- “जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव..;” अमृता फडणवीसांच्या अनोख्या शुभेच्या