मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जरांगे पाटलांनी आपला ताफा वाशीतच रोखला आहे. मुंबईत येण्याआधी सरकारने नवीन जीआर काढत जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आजची रात्र वाशीत काढणार असून बाकी मागण्यांवर उद्या अध्यादेश काढला नाही तर मुंबईतील आझाद मैदानावर येऊन धडकणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य..! मुंबईत पोहचण्याआधीच आंदोलक माघारी घेणार ?
अंतरवाली सराटीत राज्यातील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली असून त्यासोबत त्यांसदर्भात पत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केलीय. तर सामान्य प्रशासन विभागाकडून सुमंत भांगे यांच्याशी चर्चा करून सरकारकडून कोण कोणते निर्णय घेतले. त्याची माहिती करून घेतली. यातच राज्यात सापडलेल्यांना ५४ लाख नोदीं असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यातच आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. परंतु सरकारकडून याचा डेटा जरांगे पाटलांनी मागितला आहे.
हेही वाचा…मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले.
यातच कुणबी नोंदी सापडलेल्या नोंदींची माहिती ग्रामपंचायतीमध्ये लावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर शिबीरू सुरू असल्याची माहिती सरकारने दिलीय. तसेच ४५ लाख जणांना प्रमाणपत्र देऊन एका नोंदीत ५० ते १५० जणांना त्याचा लाभ होईल अन् त्यातून दोन ते अडीच कोटी समाज आरक्षणात येईल असेही जरांगे पाटलांनी सांगितले. तसेच इतरांना नोंदी शोधण्यासाठी मदत करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली असून नोंद मिलाल्यास सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटलांनी केलीय .
READ ALSO :
हेही वाचा‘मराठा वादळ’ जरांगे पाटलांनी वाशीतच रोखला, पण सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मुंबईत काही झाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार”, विरोधकांनी सरकारला दिला कडक इशारा
हेही वाचा…“तोडगा निघाला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार माजेल,” मराठा आरक्षणाबाबत कुणी दिला मोठा इशारा?