IMPIMP
Jarange Patal has given a stern warning to the government that he will not back down without taking reservation even if he is shot Jarange Patal has given a stern warning to the government that he will not back down without taking reservation even if he is shot

“गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही”, जरांगे पाटलांचा सरकारला कडक इशारा

जालना : महाराष्ट्रातल्या सरसकट समाजाला ओबीसीतील हक्काचे आमचे आरक्षण द्यावे, सरकार धरसोड करतंय.सरकार आरक्षण देईल वाटल नसल्याने आम्ही मुंबईला चाललोय. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. मराठा समाज इतका घरातून बाहेर पडणार आहे की, गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. असं म्हणत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याचा निश्चय केला आहे.

हेही वाचा…“भाजप हे पळपुटे, रणछोडदास..! भाजपचं काम फक्त पापड-लोणचं बनवण्याचं”, कुणी केली टिका ?

पुढे बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की,  मुंबईत गेल्यावर आता माघारी नाही. मी जे जे बोललो ते केले आहे. मी माझ्या समाजासाठी पुर्ण ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे. वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालेल. जर ही संधी गेली तर मराठा पोरांचे खूप हाल होणार आहेत. आरक्षण मिळाले नाही तर भविष्यात खूप नुकसान होणार आहे. मराठ्यांनी सावध व्हा, सर्वांनी घरे सोडा. आज केले नाही तर कधीच होणार नाही. नाईलाज असल्याने आम्हाला मुंबईला यावे लागणार आहे. मराठ्यांना घरी बसू नका.

हेही वाचा..चंद्रकांत खैरेंचा पत्ता कट होणार ? अंबादास दानवे बाजी मारणार? मातोश्रीवर राजकीय हालचाली वाढल्या

मराठा समाजाने ठरवलं आहे, आपण आहोत तोपर्यंत लेकरांना आरक्षण मिळवून द्यायचे. सरकारला काय करायचे ते करावे. गुन्हे दाखल करून सरकारला नरेंद्र मोदींकडून पाठ थोपटून घ्यायची असेल. येडपाटाचे ऐकायचे म्हणून सरकार हे करतंय. सरकारनं शहाणे व्हावे. मराठ्यांशिवाय काही होऊ शकत नाही हे सरकारनं समजून घ्यावे. जर खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाज दबला असता तर बीडमध्ये लाखोंचा जनसागर उसळला नसता. असं म्हणत जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर टिका केली आहे.

READ ALSO :

हेही वाचा“भारत न्याय यात्रा तुम्हाला विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न दाखवणार”, यशोमती ठाकूर यांचं विधान 

हेही वाचा..नागपुरात सुनील केदारांभोवती भाजचपचं चक्रव्युह ; आणखी एका प्रकरणात धक्का देण्याच्या तयारीत 

हेही वाचा.“८०० कोटींची कामे रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार “, महायुतीत ठिणगी, अजित पवारांवर भाजप व शिंदे गटाच्या सदस्यांचा आक्षेप 

हेही वाचा…“काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा”, 6200 किलोमीटर, १४ राज्य अन् २० मार्चला मुंबईत होणार समारोप 

हेही वाचा“तुम्ही प्रसाद दिला तर आमचे कार्यकर्ते महाप्रसाद देतील,” ठाकरे गटाच्या महिला नेत्याने शिंदे गटाच्या नेत्याला दिला इशारा