अलिबाग : महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र आणि युवा सेनेचे नेते विकासशेठ गोगावले यांना चांगलाच इशारा दिला आहे. मागील दोन ते तीन महिन्यापासून विकास गोगावले आणि स्नेहल जगताप यांच्यात वाकृयुद्ध रंगल आहे. त्यावरून आता तुम्ही प्रसाद दिला तर आमचे कार्यकर्ते देखील महाप्रसाद द्यायला सक्षम आहेत. असा इशारा स्नेहल जगताप यांनी दिला आहे.
हेही वाचा…ठाणे हादरलं..! शिंदे गटातील माजी नगरसेवकाच्या घरावर हल्ला, रॉडने गाडीच्या काचा फोडल्या, व्हिडीओ व्हायरल
१९८५ पासून ते २००९ पर्यंत आमदार महोदयांनी केलेले चमत्कार सगळ्यांनाच माहिती आहेत. त्यामुळे ते नव्याने सांंगण्याची गरज नाही. स्नेहल जगताप यांना राजकीय अनुभव किती ? हे आता आलेल्या विकास भाऊंनी मला सांगू नये. लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून पाच वर्ष काम केलं आहे. परवा ज्या इमारतीमधून लपून पाहत होता. ती इमारत देखील याच स्नेहल जगतापच्या कारकिर्दीत बांधलीय. वडिलांच्या नेतृत्वाखाली पक्षीय पद भोगण्यापेक्षा स्वत: चं कतृत्व दाखवलं तर जनता निदान बघेल.
हेही वाचा..जपानची पदवी महाराष्ट्राला समर्पित..! फडणवीसांना कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान, पहिले भारतीय
परवा जो प्रकार झाला. त्याठिकाणी आम्ही उपस्थित नव्हतो काय ? तो कार्यक्रम कौटंबिक झाला. कौटुंबिक कार्यक्रम झाला. त्याठिकाणी उपस्थित नव्हते तरी माझे कार्यकर्ते त्याठिकाणी सक्षमपणे लढले आहेत. याचा अभिमान आम्हाला आहे. तुम्ही म्हणत असेल तर कोण कुणाला प्रसाद देतंय. तर येत्या काळामध्ये महाप्रसाद देण्यासाठी माझे कार्यकर्ते सक्षम आहे. असा इशारा देखील स्नेहल जगताप यांनी दिला आहे.
उडानटप्पू नादान विकास गोगावलेनी आपल्या लायकीत रहावे..
वडिलांच्या जीवावर नको ते धंदे करणाऱ्यांना
आमच्या शिवसेनेच्या रणरागिणीनी परवा जोरदार प्रतिउत्तर दिलेले आहे,इथून पुढे जर शिवसेनेच्या नादी लागलात तर आणखी चोख प्रतिउत्तर देऊ. pic.twitter.com/nUgWwqQNBN
— Snehal Jagtap (@SnehalJagtap_) December 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“भाजप हे पळपुटे, रणछोडदास..! भाजपचं काम फक्त पापड-लोणचं बनवण्याचं”, कुणी केली टिका ?
हेही वाचा..चंद्रकांत खैरेंचा पत्ता कट होणार ? अंबादास दानवे बाजी मारणार? मातोश्रीवर राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा..लोकसभेसाठी वंचितने महाविकास आघाडीकडे मागितल्या ‘इतक्या’ जागा ; दोन आठवड्याची दिली मुदत, नाहीतर..
हेही वाचा…“वॉशिंग मशीनची बी टीम सक्रिय होतेय”, जलीलच्या लोकसभा युतीच्या प्रस्तावावर ठाकरे गटाची खोचक प्रतिक्रिया
हेही वाचा…विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजपने ‘या’ नेत्याकडे दिली जबाबदारी ; मोदींसह भाजपच्या नेत्यांचे संपुर्ण देशात होणार दौरे