मुंबई : अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्या नगरी सजली असून व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण देखील पाठवण्यास सुरूवात झाले आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले नाही. यावरून आता ठाकरे गटाकडून सातत्याने भाजपवर टिका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाबरी पाडण्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा..जपानची पदवी महाराष्ट्राला समर्पित..! फडणवीसांना कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान, पहिले भारतीय
बाबरी आंदोलनात सगळीकडे शिवसेनाच आहे. भाजप ही पळपुटे, रणछोडदास आहे. कारण या आंदोलनात भाजप कुठेच नव्हती. खरं तर भाजपने शिवसेनेचा इतिहास पाहिला पाहिजे. बाबरी पाडण्याचं कृत हे शिवसैनिकांनी केलं असून भाजपचा त्यात कोणताही हात नाही असं विधान तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सुदर्शन भंडारी यांनी केलं आहे. सुदर्शन भंडारी यांनी हे अधिकृतपणे स्टेटमेंट दिलं होतं. हे भाजपने तपासून पाहावं, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे.
हेही वाचा..“तेव्हा विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता, तरीही..,”पंतप्रधानपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान
दरम्यान, भाजप आमच्यावर टिका करत आहे. परंतु भाजपची मानसिक स्थिती नाहीय. २०१४ नंतर जन्माला आलेली बालकं आहेत. आधीचा भारत, स्वातंत्र्य काळातील संघर्ष यांना माहिती नाही. भाजपचं मुंबईतील लढ्यातील योगदान, स्वातंत्र्य काळातील योगदान , १९९२ मध्ये मुंबईत हिंदू वाचवण्यासाठी झालेल्या लढ्यातील योगदान काहीच नाही. लढण्याच्या मैदानात, प्रक्रियेत असल्याचं भाजपने सांगावं आणि मगच लोणीची पापड विकत बसावं, असा घणाघात देखील राऊतांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा..चंद्रकांत खैरेंचा पत्ता कट होणार ? अंबादास दानवे बाजी मारणार? मातोश्रीवर राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा..लोकसभेसाठी वंचितने महाविकास आघाडीकडे मागितल्या ‘इतक्या’ जागा ; दोन आठवड्याची दिली मुदत, नाहीतर..
हेही वाचा…“वॉशिंग मशीनची बी टीम सक्रिय होतेय”, जलीलच्या लोकसभा युतीच्या प्रस्तावावर ठाकरे गटाची खोचक प्रतिक्रिया
हेही वाचा…विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजपने ‘या’ नेत्याकडे दिली जबाबदारी ; मोदींसह भाजपच्या नेत्यांचे संपुर्ण देशात होणार दौरे
हेही वाचा…ठाणे हादरलं..! शिंदे गटातील माजी नगरसेवकाच्या घरावर हल्ला, रॉडने गाडीच्या काचा फोडल्या, व्हिडीओ व्हायरल