मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहे. मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्यात येणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. त्यावर मराठा आरक्षणाला ओबीसींनी आव्हान दिल्यास आम्हीही ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान देऊ आणि ते आरक्षण रद्द करण्याची मागणी करू, असं जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यावर आता राज्य मागासवर्गाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांना प्रतिआव्हान दिले आहे.
हेही वाचा…” केतकी पाटील यांनी घेतली रक्षा खडसेंची भेट”, राजकारणात एकच चर्चा
जरांगे पाटील यांना गोरगरिब मराठ्यांचे काहीही पडले नाही. हजारो वर्षांपासून दबलेल्या-पिचलेल्या लोकांना जे आरक्षण मिळाले, ते जरांगे पाटील यांना संपवायचे आहे. एका बाजूला ओबीसीतून आरक्षण मागायचे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या आरक्षणालाच विरोध करायचा. ही जरांगे पाटील यांची विसंगती आहे. अशी टिका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
हेही वाचा…“लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला घरी बसवा, महाराष्ट्र ‘भाजपामुक्त’ करण्याचा प्रयत्न करा”
दरम्यान, जरांगे तुला तुझ्या लेकरा बाळांचे पडलेले नाही तर तुला गोरगरीब ओबीसीचा हक्क हिरावून घ्यायचा आहे. सरकारवर दबाब आणून आरक्षण मिळाले. परंतु ते कोर्टात टिकणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानिक पदावर राहून पदाचा गैरवापर केला आहे. असा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला आहे. त्यामुळे आता कोर्टात नक्की भेटू असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगे पाटील अन् मुख्यमंत्र्यांच्या कराराने दोन बळी घेतले, एक बळी भाजपचा गेला अन् दुसरा..
हेही वाचा…“रामराज्यात तरी खोटं बोलणं सोडा रे”, म्हणून आव्हाडांनी भाजपला लगावला खोचक टोला
हेही वाचा..“मा. अजितदादा, साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी..” पुतण्याचं काकांना पत्र
हेही वाचापुण्यात मोठा राडा ! कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…“भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन लढावं”, प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, छगन भुजबळ संतापले