पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात सातत्याने चर्चेत आलेले कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त गोखलेनगर भागात आशानगर परिसरात महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा राडा केला होता. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पाण्याची टाकी बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु टाकीच्या उद्घाटनाचे श्रेय भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचा आरोप धंगेकरांनी केला.
हेही वाचा…महायुतीत एकच खळबळ ! “निवडणुका लागताच महायुतीत भूंकप होणार,” राज्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिला सुचक इशारा
गोखलेनगर भागातील आशानगर येथे पाण्याच्या टाकीचं उद्घाटन कॉंग्रेसने केले होते. परंतु त्याचे श्रेय भाजपचे नेते घेत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला. त्यानंतर उद्घाटनाच्या दिवशीच मोठा राडा झाला. धंगेकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी शिवीगाळ करून धमकावले होते. या घटनेची ध्वनिचिक्षफित समाजमाध्यमात व्हायरल झाली होती. धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महापालिका आणि अधिकाऱ्यांनी याचा तीव्र निषेध व्यक्त केला. तर भाजपकडून धंगेकरांवर जोरदार टिका करण्यात आली.
हेही वाचा…आता पुन्हा राज्यात नॉटरिचेबल का होतो? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले…
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्यावर या आधी देखील एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीतील जलपर्णी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप धंगेकर यांच्यावर करण्यात आला होता. त्यावेळी धंगेकर यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना चप्पल फेकून मारली होती. याप्रकरणी धंगेकरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
READ ALSO :
हेही वाचा…“भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन लढावं”, प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, छगन भुजबळ संतापले
हेही वाचा…” केतकी पाटील यांनी घेतली रक्षा खडसेंची भेट”, राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…“लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला घरी बसवा, महाराष्ट्र ‘भाजपामुक्त’ करण्याचा प्रयत्न करा”
हेही वाचापंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपकडून खासदार होणार ? भाजपची रणनिती ठरली, कुणाचा पत्ता कट होणार ?
हेही वाचा…“जात बदलून, मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का ?” भाजपच्या माजी खासदाराचा तिखट सवाल