सिंधुदूर्ग : मराठा आरक्षणासंदर्भात कुणबी नोंदी शोधण्याचे काम राज्य सरकारकडून वेगाने सुरू आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी सगेसोयऱ्यांची मागणी मान्य करत सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत सरकारने अध्यादेश देखील काढला असून अनेक मागण्या यामध्ये मान्य करण्यात आल्या आहेत. सुरूवातीपासून जरांगे पाटलांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली होती. तर दुसरीकडे कोकणातून कुणबी या शब्दाला विरोध करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी यासाठी विरोध दर्शविला आहे.
हेही वाचा…लोकसभा अध्यक्षांनी नार्वेकरांकडे सोपवली मोठी जबाबदारी ? नार्वेकर अन् बिर्ला यांच्या नियुक्तीवर आव्हाड संतापले
कुणबी समाजाच्या नोंदी शोधा परंतु त्याला नाव मराठा आरक्षण हवंय? सगेसोयरे कुणबी समाजात शोधा परंतु त्याला नाव मराठा आरक्षण हवंय? काही समाजाच्या माणसांची नोंद कुणबी समाजात सापडल्या परंतु त्याला मराठा आरक्षण देण्यात यावे, जात बदलून, मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का ? असा सवाल देखील त्यांनी केलाय. तसेच कुणबी समाजावर आमचं प्रेम आहे, परंतु लढ्यामध्ये मराठा आरक्षण कुठे आहे ? असा सवाल देखील निलेश राणे यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा…नाशिक लोकसभेच्या आखाड्यात शांतिगिरी महाजारांची एंन्ट्री, मोदींचा नाशिक दौरा अन् लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत
कोकणातील मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र नकोय, अशी जाहीर भूमिका राणे कुटुंबियांनी घेतली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर जाहीरपणे आपली भूमिका बोलून दाखविली आहे. त्यातच आता निलेश राणे यांनी देखील याला विरोध केलाय. ३४ टक्के मराठ्यांचा लढा मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार मार्गी लागेल आणि प्रमाणपत्रावर मराठा अशी नोंद असेल ही अपेक्षा माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून करतो, असे देखील निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.
शोधा कुणबी समाजाच्या नोंदी पण नाव मराठा आरक्षण??
सगेसोयरे कुणबी समाजात शोधा पण नाव मराठा आरक्षण??
काही मराठा समाजाच्या माणसांची नोंद कुणबी समाजात सापडल्या पण नाव मराठा आरक्षण??
जात बदलून, मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का??
कुणबी समाजावर आमचं प्रेम पण या लढ्या…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 30, 2024
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीत एकच खळबळ ! “निवडणुका लागताच महायुतीत भूंकप होणार,” राज्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिला सुचक इशारा
हेही वाचा…आता पुन्हा राज्यात नॉटरिचेबल का होतो? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले…
हेही वाचा…सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी महापौर अन् पाटलांचा कट्टर समर्थक अजित पवार गटाच्या गळाला
हेही वाचा… मोठी बातमी….! राज्यसभेसाठी निवडणुक जाहीर, महाराष्ट्रातील पाच जागांसाठी कोण असणार उमेदवार ?
हेही वाचा…“मराठे युद्धात जिंकले, परंतु तहात हरले,” अशी चर्चा, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया…