नाशिक : राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौरा केला. त्यानंतर नाशिकचे राजकीय महत्व विशेष करून वाढू लागले आहे. यातच आता नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आलं असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याआधी देखील शांतीगिरी महाराज यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटील तुम्हाला माझा सलाम,” इत्मियाज जलील यांचं भावनिक ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आले असता शांतीगिरी महाराज यांनी मोदींची भेट घेतली. त्यानंतर गोदापुजन केल्यानंतर मोदींसोबत शांतीगिरी महाराजांचा एक फोटो व्हायरल झाला. त्यानंतर या फोटोमध्ये लोकसभेच्या तयारीला लागा. असा संदेश पंतप्रधान मोदींकडून देण्यात आल्याचा उल्लेख होऊ लागला. त्यानंतर शांतिगिरी महाराज लोकसभा लढवणार अशा चर्चा राजकीय क्षेत्रात होऊ लागल्या. शांतीगिरीजी महाराजांनी याआधी 2009 साली छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभा लढविली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते पडली होती.
हेही वाचा…“मागण्या मान्य केल्या, पण आरक्षण कधी, मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा”, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची बोलकी प्रतिक्रिया
यातच आता पुन्हा लोकसभा निवडणुक लढवण्याचे महाराजांनी ठरवले आहे. यातच शांतीगिरी महाराज यांचा छत्रपती संभाजीनगर, तसेच नाशिकमध्ये दांडगा संपर्क आहे. नुकताच महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथे धार्मिक अनुष्ठान पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने भक्तपरिवार उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात बाबांचा भक्तपरिवार असल्याने तसेच त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील असल्याने त्यांचा नाशिकमध्ये दांडगा संपर्क आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराज काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहे. लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे. भजन, प्रवचन, अनुष्ठान, सत्संगच्या माध्यमातून धार्मिक कार्यात पुढाकार ते घेतात. देशभरात त्यांचे ११५ आश्रम आहेत. ७ गुरूकुल देखील ते चालवितात. अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांची मौनीगिरी महाराज अशीही ओळख आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
हेही वाचा…“पेंग्विन सेनेने त्यापेक्षा आपल्या विझत्या दिव्या खालचा अंधार बघावा”, भाजपचा ठाकरेंना खोचक टोला
हेही वाचा…“आमचा बाप सागर बंगल्यावर राहतो”, म्हणणाऱ्या नितेश राणेंचा वडेट्टीवारांनी घेतला चांगलाच समाचार, म्हणाले..,
हेही वाचा…महादेव जानकरांनी निवडला लोकसभेसाठी आपला मतदारसंघ, महायुतीसह आघाडीलाही धक्का देणार ?
हेही वाचा…“निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्र्यांकडून मराठा आणि OBC समाजाची फसवणूक,” विरोधी पक्षनेत्याचा हल्लाबोल