परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान असून याठिकाणी आपला एक आमदार, जिल्हा परिषद सदस्, पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका पक्षाच्या ताब्यात असल्याने आपण परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार. असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. महादेव जानकरांचा पक्ष सध्या महायुतीत आहे. परंतु जागावाटपावरून जानकरांनी भाजपवर जोरदार टिका केलीय. त्यामुळे महादेव जानकारांच्या या घोषणांमुळे परभणी लोकसभेचे गणित चांगलाचं बिघडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून दिसून येत आहे.
हेही वाचा…“मराठा आंदोलनाला मोठं यश..! सरकारने ‘सगेसोयरे’ “या” शब्दाची व्याख्या काय केलीय ?” वाचा सविस्तर
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ओबीसी विरूद्ध मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली आहे. महादेव जानकर सातत्याने ओबीसी मंचावरून आपली भूमिका मांडत आहेत. त्याचाच धागा पकडत आता परभणीतून लोकसभा निवडणुक लढवण्याचे जानकरांनी घोषीत केले आहे.परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये हटकर, धनगर, माळी, वंजारी मायक्रो ओबीसी यांच्यासह अनुसूचित जाती यांचे मिळून जवळपास १५ लाख मतदान असून राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे देखील आहे. त्यामुळे याठिकाणी आणची ताकद जास्त असल्याचे जानकरांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“छगनरावांनी आता तातडीने राजीनामा देऊन निषेध नोंदवावा,” शरद पवार गटाने भुजबळांना डिवचलं
महादेव जानकर सध्या महायुतीत आहेत. परंतु त्यांच्या मागील काही भूमिका या भाजपच्या विरोधात राहिल्या आहेत. यातच महायुतीत ही जागा भाजप, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेला गेल्यास तरी आमची ताकद अधिक असून हा मतदारसंघ जिंकण्यासाठी आपण निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांनी परभणी लोकसभा निवडणुक बाजी मारली. संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा पराभव केला होता. तर 2014 साली देखील संजय जाधव यांनी 5 लाख 78 हजार 455 मते मिळवून राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांना पराभूत केले होते. यातच आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत ही जागा कुणाच्या वाटेला जाणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु यात महादेव जानकर कशा पद्धतीने लढत देणार ? तेही पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्र्यांकडून मराठा आणि OBC समाजाची फसवणूक,” विरोधी पक्षनेत्याचा हल्लाबोल
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटील तुम्हाला माझा सलाम,” इत्मियाज जलील यांचं भावनिक ट्विट
हेही वाचा…“मागण्या मान्य केल्या, पण आरक्षण कधी, मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा”, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची बोलकी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ शपथ खरी करून दाखवली”, मराठा आरक्षणावर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, म्हणाले…अशा प्रवृत्ती