पुणे : मागील काही दिवसापासून पुण्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणावरून अनेक चौकशा सुरू आहेत. तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांची कुख्यात गुंड गजा मारणेनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गजा मारणेनी पार्थ पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी पार्थ पवार यांच्यासोबत अजित पवार गटाचे शहाराध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेवकर दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख देखील उपस्तित होते. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
गुंड गजा मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली आहे. ती अत्यंत चुकीची गोष्ट घडलेली आहे. त्याबद्दल माहिती घेतो, परंतु पार्थ पवारांना कार्यकर्त्यांनी त्याला घेऊन गेले अन् त्या घरात ती व्यक्ती होती. यातच डिपार्टमेंटला वारंवार सांगतो की, अशा प्रवृत्तीच्या काही व्यक्ती असतील तर त्यांना आजूबाजूला येऊ देऊ नका. तसेच पार्थ पवारांना अद्यापही काही सांगितलं नाही.परंतु घरी भेट झाल्यावर सांगणार, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. पक्ष वाढवण्यासाठी भेट दिली तर आणखी काही काम होतं ते माहिती नाही. असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांना टोला लगावला.
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहे. मारणे टोळीची कोथरूड, तसेच शहरात दहशत असून मारणे याच्या पत्नी जयश्री या मनसेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. मारणेनेे पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, गजा उर्फ महाज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा जन्म मुळशी तालुक्यातील गावात झाला असून शास्त्रीनगरमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला होता. कोथरूड आणि पुणे शहरात मारणे टोळीची दहशत आहे. घायवळ गॅग आणि मारणे गॅंग यांच्यातील वर्चस्वाचा वाद सगळ्यांना माहिती आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगे-भुजबळ वाद ताणला, “जर उद्या ओबीसींवर अन्याय झाला तर…”भुजबळांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…“तर गावाकडे राहिलेले सर्वच मराठे झाडून मुंबईत येतील”, जरांगे पाटलांनी दिला सरकारला इशारा
हेही वाचा…“प्रचंड गर्दी, डोक्यावर आग ओकणारा सुर्य”, जरांगे पाटलांकडे सरकारचा जीआर घेऊन आलेल्या मंगेश चिवटे खाली कोसळले
हेही वाचा…जरांगे पाटलांनी आपला मुक्काम वाशीत वाढवला, जरांगे पाटलांच्या सरकारकडून कोणत्या मागण्या मान्य झाल्या ?
हेही वाचा‘मराठा वादळ’ जरांगे पाटलांनी वाशीतच रोखला, पण सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा