मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नवीन जीआर काढला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात सरकारने नवीन जीआर काढला असून तो जीआर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या हाती सोपविला आहे. आता या जीआरमध्ये सगेसोयऱ्यांची व्याख्या कशा पद्धतीने करण्यात आलीय. त्यासंदर्भात माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या नवीन अध्यादेशात असं म्हटलंय की, कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा मोठा लढा जरांगे पाटलांनी जिकंला,” अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.
हेही वाचा…“हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पुर्ण करणारा शेतकरी पुत्र,” मुख्यमंत्री काय काय म्हणाले ?
ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. असं सरकारने काढलेल्य जीआरमध्ये सांगितलंय.
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दूरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील.
READ ALSO :
हेही वाचा…“छगनरावांनी आता तातडीने राजीनामा देऊन निषेध नोंदवावा,” शरद पवार गटाने भुजबळांना डिवचलं
हेही वाचा…” त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, लढा जिंकला, पण…
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का : अजित पवारांचा प्रमुख शिलेदार खासदार अमोल कोल्हेंच्या ‘गळाला’?
हेही वाचा…“लढाई जिंकलीय, संघर्ष अजूनही बाकीय,” सरकारच्या अध्यादेशावर १६ तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत, काय होणार ?
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा ‘अध्यादेश’ निघाताच गुणरत्ने सदावर्तेंचं मोठं विधान, कोर्टाची लढाई पुन्हा सुरू ?