पिंपरी । विशेष प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक धक्का देण्याची तयारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरू झाली आहे. त्याची सुरवात तळवडेतून होण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक पंकज भालेकर आणि सहकारी यांनी डॉ. कोल्हे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांशी सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की, वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा…“प्रचंड गर्दी, डोक्यावर आग ओकणारा सुर्य”, जरांगे पाटलांकडे सरकारचा जीआर घेऊन आलेल्या मंगेश चिवटे खाली कोसळले
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. कोल्हेंना शह देण्यासाठी अजित पवारांनी रणनिती आखली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अजित पवार यांनी स्वत: कोल्हे यांच्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. याला प्रत्त्यूत्तर देत डॉ. कोल्हे यांनीही अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले आहे.
हेही वाचा…जरांगे पाटलांनी आपला मुक्काम वाशीत वाढवला, जरांगे पाटलांच्या सरकारकडून कोणत्या मागण्या मान्य झाल्या ?
तळवडे येथे विविध विकासकामांचा शुभरंभ नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने डॉ. कोल्हे यांनी मोशी, तळवडे भागात दौरा केला. या दौऱ्याच्या निमित्ताने माजी नगरसेवक पंकज भालेकर, धनंजय भालेकर यांच्यासह प्रमुख मंडळी आवर्जुन उपस्थित राहिली. ‘सोशल मीडियावर’ तशी छायाचित्रे आणि ध्वनीफितीही व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या गोटात सर्व अलबेल नाही, असे स्पष्ट झाले आहे.
कविता आल्हाट, अतिश बारणे कार्यक्रमात सहभागी होणे टाळले…
वास्तविक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे विश्वासू सहकारी म्हणून माजी नगरसेवक पंकज भालेकर यांची ओळख आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार शहराच्या दौऱ्यावर आले असता पंकज भालेकर, धनंजय भालेकर यांना व्यासपीठावर मानाचे स्थान असते. किंबहुना अजित पवार यांच्याकडे त्यांच्या शब्दाला मानही आहे. त्यामुळे अजित पवार यांनी डॉ. कोल्हे यांना थेट ‘टार्गेट’ केले असताना भालेकर यांनी जाहीरपणे कार्यक्रमात सहभागी होण्याची भूमिका का घेतली असावी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याउलट, महिला सेलच्या शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट किंवा उपाध्यक्ष अतिश बारणे यांचाही डॉ. कोल्हे यांच्याशी सलोखा आहे. पण, त्यांनीही जाहीरपणे कोल्हे यांच्या कार्यक्रमात सहभागी होणे टाळल्याचे पहायला मिळाले.
READ ALSO :
हेही वाचा…“लढाई जिंकलीय, संघर्ष अजूनही बाकीय,” सरकारच्या अध्यादेशावर १६ तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत, काय होणार ?
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा ‘अध्यादेश’ निघाताच गुणरत्ने सदावर्तेंचं मोठं विधान, कोर्टाची लढाई पुन्हा सुरू ?
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा मोठा लढा जरांगे पाटलांनी जिकंला,” अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पुर्ण करणारा शेतकरी पुत्र,” मुख्यमंत्री काय काय म्हणाले ?
हेही वाचा…“तर गावाकडे राहिलेले सर्वच मराठे झाडून मुंबईत येतील”, जरांगे पाटलांनी दिला सरकारला इशारा