मुंबई : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांनी पाळलेली नाही. आज मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेली अधिसूचना ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक आहे. अशी मोठी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
हेही वाचा…“छगनरावांनी आता तातडीने राजीनामा देऊन निषेध नोंदवावा,” शरद पवार गटाने भुजबळांना डिवचलं
पुढे बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारचा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर न टिकणारे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसविण्यासाठी केलेली बनवाबनवी असून दुसरे काही नाही. सर्व पक्षीय बैठकीत आम्हाला विश्वास देण्यात आला होता की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सरकार धक्का लावणार नाही. मात्र आजची सूचना म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर आक्रमण करण्यासाठी सरकारने टाकलेले पाऊल आहे. निवडणुकीच्या तोंडावर बनवा बनवी करून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक करण्याचे पाप मुख्यमंत्री महोदयांनी करू नये. ही बनवा बनवी ओबीसी आणि मराठा समाज सहन करणार नाही. असा इशारा देखील वडेट्टीवारांनी दिलाय.
हेही वाचा…” त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, लढा जिंकला, पण…
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशावर येत्या १६ फेब्रुवारी पर्यंत हरकती घेता येणार आहेत. परंतु राज्य सरकारने काढलेला अध्यादेश कायद्याच्या चौकटीत टिकणार नाहीत. अशा प्रतिक्रिया राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा संपलेला आहे. परंतु आरक्षण अजूनही तसंच असल्याचं दिसून येत आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांनी पाळलेली नाही.
आज मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेली अधिसूचना ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक आहे.
सरकारचा…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 27, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटील तुम्हाला माझा सलाम,” इत्मियाज जलील यांचं भावनिक ट्विट
हेही वाचा…“मागण्या मान्य केल्या, पण आरक्षण कधी, मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा”, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची बोलकी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ शपथ खरी करून दाखवली”, मराठा आरक्षणावर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, म्हणाले…अशा प्रवृत्ती
हेही वाचा…“मराठा आंदोलनाला मोठं यश..! सरकारने ‘सगेसोयरे’ “या” शब्दाची व्याख्या काय केलीय ?” वाचा सविस्तर