मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. याबाबत राज्य सरकारने नवीन जीआर काढला असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या हाती सुपुर्द केला. जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या होत्या. त्याचा सरकारकडून अध्यादेश काढण्यात आलाय. पंरतु अजूनही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का : अजित पवारांचा प्रमुख शिलेदार खासदार अमोल कोल्हेंच्या ‘गळाला’?
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाच्या विरोधात हरकती घेण्याबाबात १६ फेब्रूवारपर्यंत मुदत देण्यात आलीय. त्यामुळे युद्ध जिंकलंय, परंतु खरी लढाई अजूनही सुरूच असल्याची प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच राज ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. राज ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा ! असा टोला देखील राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
हेही वाचा…“लढाई जिंकलीय, संघर्ष अजूनही बाकीय,” सरकारच्या अध्यादेशावर १६ तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत, काय होणार ?
दरम्यान, राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला आहे. उद्या यासंदर्भात पाच वाजता सर्वपक्षीय ओबीसी व इतर समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडणार असून पुढची रणनिती या बैठकीत मांडली जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे सरकारने काढलेल्या अध्यादेशावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही…
— Raj Thackeray (@RajThackeray) January 27, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ शपथ खरी करून दाखवली”, मराठा आरक्षणावर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, म्हणाले…अशा प्रवृत्ती
हेही वाचा…“मराठा आंदोलनाला मोठं यश..! सरकारने ‘सगेसोयरे’ “या” शब्दाची व्याख्या काय केलीय ?” वाचा सविस्तर
हेही वाचा…“छगनरावांनी आता तातडीने राजीनामा देऊन निषेध नोंदवावा,” शरद पवार गटाने भुजबळांना डिवचलं
हेही वाचा…” त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, लढा जिंकला, पण…