सोलापूर : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचा ३९ वा रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहिमेची सांगता सोहळा महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार या गावात झाली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे देखील उपस्थित होते. यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी आपला बाप सागर बंगल्यावर राहतो. त्यामुळे आपलं कुणी वाकडं करू शकत नाही. असं विधान केलं. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांना चांगलाच टोला लगावला.
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, म्हणाले…अशा प्रवृत्ती
जे लोक हिंदुना त्रास देतात त्यांचा कार्यक्रम करून मला फोन करा, काही घटना झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका. तुम्ही कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका, घरी पोहचल्यानंतर तुम्ही फोन करा. तुमची काळजी आम्ही घेतो. अन् हे पोलिसांसमोर देतो आहे. कुणीही वाकडं करू शकत नाही. आपला बाप सागर बॅंगल्यावर बसला आहे. आम्हा लोकांना काही होत नाही. असं नितेश राणे यांनी बोलतांना सांगितले.
हेही वाचा…“मराठा आंदोलनाला मोठं यश..! सरकारने ‘सगेसोयरे’ “या” शब्दाची व्याख्या काय केलीय ?” वाचा सविस्तर
दरम्यान, नितेश राणे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार वडेट्टीवारांनी घेतला. आमचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे अन् आमचं कुणीही वाकडं करू शकत नाही. बंगल्यावर बसलेले बाप आणि मालक दिर्घकाळ राहत नसतात. ते दिर्घकाळ टिकत नसतात. आज कुणीही सत्तेचं मुकट कायमस्वरूपी बसलेला नाहीय. उद्याची सत्ता गेली तर त्याचं परिणाम सगळ्यांना भोगावं लागतात. असा टोला विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांना लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…महादेव जानकरांनी निवडला लोकसभेसाठी आपला मतदारसंघ, महायुतीसह आघाडीलाही धक्का देणार ?
हेही वाचा…“निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्र्यांकडून मराठा आणि OBC समाजाची फसवणूक,” विरोधी पक्षनेत्याचा हल्लाबोल
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटील तुम्हाला माझा सलाम,” इत्मियाज जलील यांचं भावनिक ट्विट
हेही वाचा…“मागण्या मान्य केल्या, पण आरक्षण कधी, मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा”, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची बोलकी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ शपथ खरी करून दाखवली”, मराठा आरक्षणावर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया