सांगली : राज्यात झालेल्या पक्ष फुटीनंतर आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेकजण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटाने मोठा धक्का दिला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा…“पेंग्विन सेनेने त्यापेक्षा आपल्या विझत्या दिव्या खालचा अंधार बघावा”, भाजपचा ठाकरेंना खोचक टोला
अजित पवार कोल्हापुर आणि सांगली दौऱ्यावर असतांना त्यांची अनेकांनी भेट घेतली. सांगलीतील माजी महापौर व नगरसेवकांनी भेट घेत पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तेब केलाय. यामध्ये शरद पवार यांच्या गटातील माजी प्रदेश उपाध्यक्ष व माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक हणमंत पाटील विष्णू माने, गजानन मगदूम यांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष. प्रा. पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी उपस्थित होते.
हेही वाचा…“आमचा बाप सागर बंगल्यावर राहतो”, म्हणणाऱ्या नितेश राणेंचा वडेट्टीवारांनी घेतला चांगलाच समाचार, म्हणाले..,
दरम्यान, सुरेश पाटील, विष्णू माने हे जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या या प्रवेशाने जयंत पाटलांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चार माजी महापौर व अनेक माजी नगरसेवक अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांच्या गटाची मोठी पडझड झालीय.
READ ALSO :
हेही वाचा… मोठी बातमी….! राज्यसभेसाठी निवडणुक जाहीर, महाराष्ट्रातील पाच जागांसाठी कोण असणार उमेदवार ?
हेही वाचा…“मराठे युद्धात जिंकले, परंतु तहात हरले,” अशी चर्चा, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया…
हेही वाचा…लोकसभा अध्यक्षांनी नार्वेकरांकडे सोपवली मोठी जबाबदारी ? नार्वेकर अन् बिर्ला यांच्या नियुक्तीवर आव्हाड संतापले
हेही वाचा…नाशिक लोकसभेच्या आखाड्यात शांतिगिरी महाजारांची एंन्ट्री, मोदींचा नाशिक दौरा अन् लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत
हेही वाचा…मोठी बातमी..! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय