रावेर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या कन्या केतकी पाटील यांनी अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्ष सोहळा मुंबईत पार पडला. यानंतर लगेचच केतकी पाटील यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. केतकी पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे खासदार रक्षा खडसे यांची खासदारकी धोक्यात आली ? अशी चर्चा राजकारणात सध्या जोरदार रंगू लागली आहे. यातच आता केतकी पाटील यांनी रक्षा खडसे यांची भेट घेतली आहे.
हेही वाचा…सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी महापौर अन् पाटलांचा कट्टर समर्थक अजित पवार गटाच्या गळाला
आगामी लोकसभा निवडणुकी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढण्यास केतकी पाटील इच्छूक आहेत. त्याच कारणाने उल्हास पाटील यांच्यासह केतकी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर येतेय. अलिकडेच केतकी पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. यावेळी रक्षा खडसे यांनी केतकी पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीची प्रदेश उपाध्यक्ष झाल्याबद्दल रक्षा खडसे यांनी अभिनंदन देखील केले. या भेटीची चर्चा जोरदार सुरू झालीय.
हेही वाचा… मोठी बातमी….! राज्यसभेसाठी निवडणुक जाहीर, महाराष्ट्रातील पाच जागांसाठी कोण असणार उमेदवार ?
दरम्यान, रक्षा खडसे यांच्या भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा तसेच आगामी कामांबद्दल मार्गदर्शन घेतल्याची प्रतिक्रिया केतकी पाटील यांनी दिलीय. रावेर लोकसभा मतदारसंघ मागील काही दिवसापासून चर्चेचा ठरला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“लुटारू, भ्रष्टाचारी, जुलमी सरकारला घरी बसवा, महाराष्ट्र ‘भाजपामुक्त’ करण्याचा प्रयत्न करा”
हेही वाचापंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपकडून खासदार होणार ? भाजपची रणनिती ठरली, कुणाचा पत्ता कट होणार ?
हेही वाचा…“जात बदलून, मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का ?” भाजपच्या माजी खासदाराचा तिखट सवाल
हेही वाचा…महायुतीत एकच खळबळ ! “निवडणुका लागताच महायुतीत भूंकप होणार,” राज्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिला सुचक इशारा
हेही वाचा…आता पुन्हा राज्यात नॉटरिचेबल का होतो? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले…