पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने काल फेसबुक पोस्ट करत शरद पवार यांना नरकात जाण्याची भाषा केली आहे. त्यामुळे तिच्यावर आता चहुबाजूंनी टिका केली जात आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील केतकी चितळेला कडक शब्दात इशारा दिला आहे.
“देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे”
शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आहेत. त्याठिकाणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसचे तिच्या घरी जाऊन तिच्या तोंडाला काळं फासलं जाईल, असा इशाराही रूपाली पाटील यांनी दिला आहे.
अखेर राज ठाकरेंच्या सुरक्षितेत वाढ; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
केतकी चितळेंनी केलेली पोस्ट अत्यंत खालच्या दर्जाची असून तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचे कृत तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल अशा पद्धतीची पोस्ट केल्याने तिच्यावर कलम 505(2), 500, 501,153 ए नुसार कळवा पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील केतकी चितळ्याचा समाचार घेतला आहे. चि चि चवताळीस बाई तू महिला असली तरी छपरीच तु, संस्कार नसलेली केतकी, इतकीशी कशी चवताळीस हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. कशात ना मशात केतकीबाई तमाशात , लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला ,मिळणारच बाई तुला चोप. असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also:
- टोमणे सभेत मुख्यमंत्री, राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची बंधनं झुगारून बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करणार का?
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विरोधकांना करारा जवाब देणार का?
- “विश्वातघात तर नाना पटोलेंनी केला”; नाना पटोलेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून खंडन
- केतकीबाईला लवकरच जंगी चोपाची गरज; रूपाली पाटलांचा केतकीला इशारा
- केतकी चितळेचं डोकं फिरलं..! पवारांना उद्देशून म्हणाली की, “ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक”;