वाळवा: सांगली आणि सातारा जिल्हासह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आली आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट,डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे.दोन्ही मोहितेंआणि सत्ताधारी भोसले या तीनही पॅनलकडून प्रचार जोरदार सुरु आहे . दोन्ही मोहितेंचे मनोमिलन फिस्कटल्याने आता कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
गेल्या सहा वर्षात विद्यमान संचालक मंडळाने शेतकरी सभासदांच्या विश्वासास पात्र राहून काम केलेले आहे. आगामी काळात देखील पुन्हा एकदा सत्ता आल्यानंतर सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार पॅनल कटिबद्ध राहणार आहे असे प्रतिपादन डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे. वाळवा तालुक्यातील दुधारी येथे जयवंतराव भोसले पॅनलच्या रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटाच्या प्रचारप्रसंगी डॉ. भोसले बोलत होते. यावेळी उमेदवार जितेंद्र पाटील, जे. डी. मोरे, अविनाश खरात, मनोज पाटील, राजाराम बापू सहकारी बँकेचे संचालक आनंदराव लसेकर मानसिंग पाटील आदी उपस्थित होते.
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळून देण्यासाठी शेतीवर प्रतिक्रिया करणारा कारखाना या भागात उभारलेला आहे. शेतकरी सभासद हिताचे उपक्रम राबवित कृष्णा सहकारी कारखाना आज ब्रँड म्हणून सर्वांच्या समोर आलेला आहे.कै. अप्पासाहेब भोसले यांच्या विचारांनी काम करत डॉ. सुरेश भोसले यांनी कारखान्याला राज्यात अग्रेसर बनविले आहे. शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत सरासरी ३००० हजर इतका दर देण्यात आलेला आहे. मोफत साखरेचे अभिवचन पूर्ण करण्याचे काम सहकार पॅनलने गेल्या सहा वर्षांमध्ये केलेले आहे. या निवडणुकीत देखील नक्कीच सहकार पॅनलचा विजय होणार असे प्रतिपादन डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे.
हे पण वाचा,
कृष्णाकाठी अविनाश मोहितेंना बसणार मोठा धक्का; समर्थक सुरेश भोसलेंच्या पॅनलकडून लढण्याच्या मनस्थितीत
महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
“विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?