कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार आणि यावेळी देखील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात परिवर्तनाची लाट येणार की पुन्हा एकदा सहकार पॅनलचा कारखान्यावर दबदबा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता रंगत आलेली आहे. मात्तबर नेते आता कृष्णाच्या घमासनात लढण्यासाठी तयार झाले आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्व्जीत कदम यांनी आपली संपूर्ण ताकद रयत क्रांती पॅनलच्या डॉ. इंद्रजित मोहितेंसाठी पणाला लावली आहे. साम, दाम, दंड, भेद या चारही नीतींचा वापर करून कोणत्याही परिस्थिती रयत क्रांती पॅनलला कृष्णा सहकारी कारखान्याच्या सत्तेत बसवणार अशी भीष्मपप्रतिज्ञा सहकार राज्यमंत्री विश्व्जीत कदम यांनीकेल्याने सर्वांच्याच भुवया उंच झाल्या आहेत.
हे पण वाचा, डॉ. सुरेश भोसले आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात कृष्णा साठी ‘खलबतं’; निवडणुकीचा सस्पेन्स वाढला
हे पण वाचा, कृष्णा कारखान्यासाठी बोरगावमध्ये होणार संस्थापक पॅनल आणि सहकार पॅनल मध्ये काटे की टक्कर
इस्लामपूर येथे वाळवा तालुक्यातील काँग्रेसतर्फे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीद्वारे त्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील महत्वाच्या घडामोडींचे रणशिंग फुकले आहे. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवा नेते जितेश कदम व वाळवा तालुक्यातील रयत पॅनलचे उमेदवार यावेळी उपस्थित होते. डॉ. इंद्रजित मोहिते आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत. संपूर्ण कदम कुटुंब आणि तालुक्यातील काँग्रेस पक्ष डॉ. इंद्रजित बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कार्यकर्त्यांनी आता आपली गती वाढवावी आणि पायाला भिंगरी लावून प्रचार करावा. उमेदवारांनी मनात कोणतीही शंका न बाळगता ही निवडणूक लढवावी. मी निश्चित तुमच्या मागे आहे आणि विजय नक्कीच आपला होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा,
कृष्णाकाठी अविनाश मोहितेंना बसणार मोठा धक्का; समर्थक सुरेश भोसलेंच्या पॅनलकडून लढण्याच्या मनस्थितीत
महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
“विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?