पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणासंदर्भात मंत्री दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांचा संबंध असून त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपच्या काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे आरोप केले आहेत. यातच आता ड्रग्ज प्रकरणातून मोठा रॅकेट बाहेर येणार असून यातून अनेकांची तोंड बंद होणार असल्याचा निर्वाणीचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचाही संबंध ? दादा भुसेंनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
ड्रग्स फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन जी परिषद झाली होती. त्या परिषदेत सगळ्या युनिट्सला ड्रग्सवर कंट्रोल ठेवलं पाहिजे आणि यातील नेक्सस शोधलं पाहिजे. अशा सूचना दिल्या होत्या. त्या माध्यमातून सगळे युनिट् कामाला लागले आहेत. याच माध्यमातून मुंबई पोलिसांना देखील नाशिक येथील कारखान्याची माहिती लागली आहे. त्यावर त्यांनी धाड टाकली आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी देखील धाडी टाकल्या आहे. आता ललित पाटील हातामध्ये आला आहे. निश्चितपणे यातून मोठे नेक्सेस बाहेर येईल.
हेही वाचा…“ललित पाटीलला भरचौकात फाशी द्या,” कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केली मागणी
ललित पाटीलच्या चौकशीमधून एक मोठ नेक्सस आता बाहेर येणार असून यातून अनेकांची तोंड बंद होणार आहे. तसेच ससून रूग्णालया असो किंवा अन्य काही सर्व प्रकाराची चौकशी सुरू आहे. यातून कोणालाही सोडलं जाणार नाही. असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ड्रग्ज माफिया ललित पाटीलला आश्रय देणारा चाळीसगावातील ती व्यक्ती कोण ?”
हेही वाचा…“इंजिनाच्या वाफेचा कुणाला चटका बसणार ?”, राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला इशारा
हेही वाचा…शरद पवार ‘या’ लोकसभा मतदारसंघात मैदान मारणार, आढावा बैठकीत सगळं ठरलं
हेही वाचा…दिल्लीत अजितदादांची एन्ट्री, होम हवन करत नव्या कार्यालयाचं उद्घाटन, राष्ट्रवादीचं दोन कार्यालय
हेही वाचा…ललित पाटीलने सर्व आरोप फेटाळले, कोर्टात नेमकं काय काय घडलं ?