वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज अमर काळे निवडणुकीसाठी अर्ज दाखल करीत आहेत. यासाठी पोलिसांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाळली जाते का ? यासाठी निवडणुक विभागाच्या गाड्या पाठवल्या होत्या. मात्र निवडणुक आयोगाने पाठवलेल्या गाड्यावरच कमळाचं चिन्ह असल्याने ठाकरे गटाने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा…तिकीट नाकारलं, ठाकरे गटात होणार दाखल, ? जळगावात भाजपचाच खासदार स्मिता वाघ यांना देणार ठक्कर
वर्धेत आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वत: शरद पवार उपस्थित राहणार असून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या सभेच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी निवडणुक विभागाकडून वेगवेगळे पथक बनवून वाहने पाठविण्यात आली आहे. यापैकी निवडणूक विभागाच्या एका वाहनावर चक्क कमळाचे स्टिकर असल्याचे दिसून आले.
हेही वाचा…अकोल्यात आबंडेकरांविरोधात कॉंग्रेसने दिला उमेदवार ; डॉ. अभय पाटील यांना तिकीट,आंबेडकरांची दुहेरी भूमिका
निवडणूक विभागाच्या वाहनावरच चिन्ह असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर ठाकरे गटाने थेट रामनगर पोलीस स्टेशन गाठले. याबाबत तक्रार केली आहे. ठाकरे गटाचे जिल्ह्याध्यक्ष आशिष पांडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून आदर्श आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखळ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मिंधे गटातील अनेकांची तिकीटे कापली जाणार”, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टिका
हेही वाचा…“पवारांच्या नावानं मत मागण्याचे दिवस गेलेत, आता तुमच्या कामाचा हिशोब द्या “, आढळरावांनी कोल्हेंचा घेतला खरपुस समाचार
हेही वाचा…तिकीट कापलेले भाजप खासदार थेट राऊतांच्या भेटीला , जळगावात मोठा राजकीय भुंकप ?
हेही वाचा…“नवनीत राणांच्या विरोधात महायुतीच्याच नेत्यांनी नाराजीचा सुर आवळला”, अमरावतीत महायुतीला मोठा फटका बसणार
हेही वाचा…“एका तरुणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसूत्र विकले”, महाराष्ट्र्तील शेतकरी नेता निवडणुकीच्या रिंगणात