मुंबई : महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. शिवसेनेतील २५ आमदार मागील काही दिवसांमध्ये नाराज असल्याची चर्चा मागील काही काळात रंगली होती. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत देखील शिवसेनेच्या खासदारांनी, आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत विशेष नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत देखील शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कोल्हापूरात राजकीय आखाडा तापला; प्रचारासाठी मैदानात उतरली युवा नेत्यांची फौज
सोमवारी दिल्लीत रात्री उशिरा शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या खासदारांची एक बैठक बोलाविली होती. संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत हे बैठकीच्या केंद्रस्थानी होते. संध्याकळी सुरु झालेली बैठक रात्री बारा वाजेपर्यंत चालल्याने या बैठकीची बरीच चर्चा रंगली होती.
“ते अज्ञान लोक पंपावर पळून गेले की कदमवाडीला?”; सतेज पाटलांचा भाजपला खोचक सवाल
शिवसेना खासदारांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल बैठकीच्या सुरुवातीपासूनच नाराजीचा पाढा वाचायला सुरुवात केली. सर्वच खासदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रती नाराजीचा स्वर पाहायला मिळाला हे विशेष. मराठावाडा आणि विदर्भात राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानातून नेमकी सध्याची परिस्थिती कशी आहे याबाबत देखील आढावा घेण्यात आला. शिवसेनेचे विद्यमान मंत्री शिवसेना कार्यकर्त्यांची कामे करत नसल्याने शिवसेना आता कमकुवत होण्यास सुरुवात झाली आहे. जर हे वेळीच थांबले नाही तर याचा परिणाम शिवसेनेला भोगावा लागेल अशी भीती खासदारांनी संजय राऊत यांना व्यक्त करून दाखवली आहे.
राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यांवर मुस्लिम समाज नाराज! पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री तर शिवसेना आमदारांना खुलेआमपणे डावलत आहे. शिवसेनेच्या आमदारांना मागील काही दिवसांमध्ये निधी वाटपाच्या बाबतीत दुजाभावाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसेना आमदारांना योग्य वागणूक देत नाहीत, असा सूरही बैठकीतून उमटला आहे. आता शिवसेना आय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- राज ठाकरे साहेबांवर नाराज नाही, पण भूमिका काय घ्यावी, समजत नाही? वसंत मोरे
- “गुढीपाडव्याच्या सभेत फायरब्रॅंड नेत्याला काय झालं? रूपाली पाटलांची राज ठाकरेंच्या भाषणांवर प्रतिक्रिया
- शिवसेनेचे 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात; प्रसाद लाड यांचा दावा
- कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही; रिपाइंची राज ठाकरेंविरोधात कारवाई करण्याची मागणी
- राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांना विरोध; पुण्यात वसंत मोरेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल