पुणे : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अवस्था टायटॅनिकसारखी झाली आहे असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पुण्यात आहेत. पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक पुण्यात घेण्यात आली. या बैठकीसाठी नारायण राणे जेव्हा आले तेव्हा हे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी नारायण राणेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी ठोकला शड्डू
शिवसेना यूपीएमध्ये जाणार अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारलं असता नारायण राणे म्हणाले की शिवसेनेने महाराष्ट्राच्या सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं आहे. ते यूपीएसोबत जात आहेत तर मग हिंदुत्वाचं काय? खुर्चीसाठी ते गुंडाळूनच ठेवलं ना असं नारायण राणे म्हणाले.
…तर तिसरी लाट ओमायक्रॉनची असेल; आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत
नारायण राणे म्हणाले, ”मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची दररोज विचारपूस करतो. त्यांना फोन करतो, पण ते फोन घेत नाहीत. शिवसेनेच्या ओळखीच्या नेत्यांकडे मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत विचारत असतो.” संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काळात कधी कधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत भेटतात. त्यावेळी तुमचे साहेब कसे आहेत? अशी विचारणा त्यांना करतो. ‘आमचे साहेब चांगले आहेत,’ असे उत्तर संजय राऊत देतात, असंही राणे म्हणाले. ”राऊत संसदेच्या लॅाबिगमध्ये चांगलं बोलतात,” असा टोमणा राणेंनी यावेळी लगावला. शिवसेनेचे अनेक नेते माझ्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी बोलताना केला.
ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
नारायण राणे म्हणाले, ‘‘अटल शक्ती अभियानाच्या माध्यमातून पुणे महापालिकेत आपल्याला पुन्हा एकदा सत्ता मिळावी, यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. सध्या ९८ नगरसेवक आहेत, यावेळी १०० पेक्षा जास्त जागा याव्यात म्हणून कार्यकर्त्यांनी लोकांना भेटून आपण सत्ताधारी म्हणून कशा पद्धतीने काम केले आहे हे सांगण्यासाठी हे अभियान आहे.” ”पुणे महापालिकेत शिवसेनेचे सध्या १० नगरसेवक आहे, पण ते आता शून्य कसे होतील हेच आमचे लक्ष आहे,” राज्याचे विधीमंडळाचे अधिवेशन कमी दिवसाचे घेता यावे, यासाठी निर्बंध लादले लागते आहेत. दोन वर्ष कोरोनामुळे लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली असून, आत्ताच निर्बंध घालू नये, असही ते म्हणाले.
Read Also :
- “देवेंद्र फडणवीसांपेक्षा चंद्रकांत पाटलांचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा जास्त!”
- “नार्वेकरांचं ‘मातोश्री’शी भांडण झालं की काय?, कळत नाही!”
- खडसे vs महाजन; आगामी निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राखण्याचे महाजनांपुढे आव्हान
- भाजप नगरसेवकांची सहल, हा आचारसंहिता भंग नाही का?; काँग्रेसचा आक्षेप
- शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट; सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितिन पाटलांच्या गळ्यात