मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्राचा अखेर खुलासा झाला आहे. हे पत्र उरणमधील विजेंद्र म्हात्रे नावाच्या वकिलांनी पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पत्राबद्दल खुलासा करताना किशोरी पेडणेकर भावुक झाल्या.
गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव; आशिष शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर
वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणावरून महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यात वाद पेटला होता. पण, या प्रकरणाला आज एका धमकी पत्रामुळे धक्कादायक वळण मिळाले. महापौरांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकी पत्राबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पत्रकारांशी बोलत असताना किशोरी पेडणेकर यांनी या पत्राबद्दल धक्कादायक खुलासा केला.
३७८ दिवसांच्या अविरत संघर्षानंतर अखेर कृषी कायदे संसदेत रद्द
धमकी पत्र सकाळी मला मिळालं. गेली 40 वर्ष राजकारणात असून चारित्र्य जपलं. आज सकाळी एक पत्र मिळालं. या पत्राची भाषा अत्यंत लज्जास्पद आहे. मारून टाकु विटंबना करू, मुलगा आणि नवऱ्याला मारून टाकु तुमच्या अवयवांची विटंबना करू अशी भाषा वापरली, हे अत्यंत किळसवाने होते, असं सांगताना महापौर किशोरी पेडणेकर भावनिक झाल्या.
तुम्ही शिवसेनेचं बोट धरुनच मोठे झालात, हे विसरु नका – शंभुराज देसाई
महिलांचा मान आपण राखतो पण आता राजकीय टीका स्तर खालावत चालला आहे. वापरलेले शब्द मला क्लेशकारक आहे विजेंद्र म्हात्रे या नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र उरणमधून पाठवलंय. पोस्टल पनवेलच आहे विजेंद्र म्हात्रे याने हे पत्र लिहिलं असून तो अॅडव्होकेट आहे असे लिहिले आहे, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. ‘मला माझा पक्षाच काम महत्त्वाचे आहे परंतु माझे कुटुंब देखिल महत्त्वाचे आहे. या पत्राला मी भीक घालत नाही. याचं काही न काहीतरी कनेक्शन आहे ते पोलीस शोधून काढतील’, असंही पेडणेकर यांनी सांगितलं.
Read Also :
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिकांनी न्यायालयात मागितली बिनशर्त माफी..
- राष्ट्रवादीत कलह आणि फायदा काँग्रेसचा; मिळाले उपसभापतिपद
- शिवसेना-राष्ट्रावादीत ठिणगी; शिवसेना सोयीचे वॉर्ड तयार करत असल्याचा दावा
- अनिल परबांकडून ‘त्या’ दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..!
- विधान परिषदेत कोणाची बाजी? अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला