पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील प्रसिद्ध चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण होत आहे. परंतु त्याआधीच भाजपच्या माजी महिला आमदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चांदणी चौक पुलासाठी सातत्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. परंतु ऐनवेळी कार्यक्रमाला साधं निमंत्रण देखील दिलं नाही. असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. तर या संपुर्ण प्रकरणाबाबत त्यांनी ट्विटवर सविस्तर लिहिलं देखील आहे.
हेही वाचा…“2024 च्या निवडणुकीचा पराभव मोदींना दिसू लागलाय”, विजय वडेट्टीवारांचा मोदींवर हल्लाबोल
मेधा कुलकर्णी यांनी चांदणी चौकबाबतच्या प्रकरणाबाबत कोथरूड विधानसभा प्रमुख पुनीत जोशी यांचे देखील व्हाट्सअप क्रिनशॉट टाकले आहे. चांदणी चौक लोकर्पण सोहळ्यासाठी पुनीत जोशी यांच्याकडून निमंत्रण देण्यात आलं, परंतु यामध्ये मेधा कुलकर्णी यांचा कुठेही समावेश करण्यात आला नाही. याबाबत मेधा कुलकर्णी यांनी दोन क्रिनशॉट देखील शेअर केले आहे.
हेही वाचा…“..त्यामुळेच पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विझवायची नाही”, राहुल गांंधींची मोदींवर टिका
दरम्यान, माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. असं म्हणत मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा धरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला, आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपविले आहे. ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे. असं देखील मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांची राजकारणातून एक्झिट ?
हेही वाचा…राज्यसभेच्या त्या ९ खासदारांचा कार्यकाळ संपला, नवीन निवडणुका कधी ?
हेही वाचा…“राजकारणासाठी इडीच्या चौकशा लावल्या जातात, पण.,” अनिल देशमुखांची जोरदार टिका
हेही वाचा…“मोदी-शहांच्या कार्यक्रमाला डावललं, अन् चांदणी चौकाच्याही कार्यक्रमात,” भाजपच्या माजी महिला आमदार अंतर्गत राजकारणावर नाराज
हेही वाचा…“माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचं प्रयत्न”, मेधा कुलकर्णींचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप