बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलंय. अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावरून मंत्री दादा भुसे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना दादा भुसे यांनी अजित पवार हे अनेक वर्षांपासून अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे असं म्हटलं.
हेही वाचा… भाजप नेत्या पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी रेड
दादा भुसे म्हणाले की, अजित पवार यांच्याबाबत मला माहिती नाही. वरिष्ठ पातळीवर या गोष्टी सुरू आहेत. अजित दादा अस्वस्थ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दादा अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं.
हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयातून दिलासा..!
ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर रडल्याचा दावा केला होता. याबद्दल विचारले असता दादा भुसेंनी सांगितलं की, हा एक केविलवाणा प्रयत्न आहे. बालिशपणा आहे अस मला वाटतं. त्यांनी त्याच वेळी बोलायला हवं होतं. ही राहुल गाधी स्टाईल असून बाहेर जाऊन देशाची बदनामी करत आहेत.
Read also
हेही वाचा… “चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा? त्यांचा रुबाब पुणेकर उतरवतील”; धंगेकरांची खोचक टीका
हेही वाचा… ‘माझं मुख्यमंत्रीपद वाचव म्हणून, ठाकरेंनी शिंदे यांच्याकडे केली होती गयावया’
हेही वाचा… “उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.”