कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर सध्या चर्चेत आहेत. भाजप उमेदवाराचा केलेल्या पराभवामुळे त्यांची चर्चा राज्यभर झाली. पुणे शहरात त्यांनी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करणे सुरु केले आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत हू इज धंगेकर असा प्रश्न विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं प्रत्यक्ष नाव न घेता तयार केलेले गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ करत आहे.
हेही वाचा… ‘एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले?’; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
अगं चंपाबाई, धंगेकरला जीव थोडा लाव… मतानं कसा उधलून टाकलाय डाव… अशा ओळींतून आमदार रवींद्र धंगेकर यांचं गाणं कलाकारांनी तयार केले होते. आता स्वत: रवींद्र धंगेकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेरले आहे.
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटील यांच्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा? किती दिवस ठेवायचा हे पुणेकर पाहतील,असा टोला त्यांनी लगावला आहे. येत्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील कोल्हापूरला जातील की थांबतील हे लवकर कळेल. त्यांच्या बोलण्याचा रुबाब हा पुणेकर उतरवतील, असे त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा… अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे राजकारणात खळबळ
रवींद्र धंगेकर यांनी भाजप व शिवसेनेवर टीका केली. राज्यात ईडीचे सरकार असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप सर्व्ह करतं जिंकत असलं तरचं निवडणुका जिंकू शकत नाही. पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लागली तर महाविकास आघाडीच विजयी होईल, असा दावा आमदार धंगेकर यांनी केला. लोकसभेची जागा कोण लढवावी, हा निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील, असे त्यांनी म्हटले.
Read also
हेही वाचा… ‘माझं मुख्यमंत्रीपद वाचव म्हणून, ठाकरेंनी शिंदे यांच्याकडे केली होती गयावया’
हेही वाचा… “उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.”
हेही वाचा… भाजप नेत्या पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी रेड
हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयातून दिलासा..!