पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत अन्य कोणताही चेहरा नाही, असं म्हटलं जात असतानाच एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर विराजमान होतील तर 2029 मध्ये हिंदुस्थानचे पंतप्रधान योगी आदित्यनाथ होतील, असा दावा आमदार संतोष बांगर यांनी केलाय.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर चर्चेत आलेले हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे नुकतेच शिंदेंसोबत अयोध्या दौऱ्यावरून परत आले. हिंगोलीत आगमन झाल्यानंतर त्यांनी टीव्ही9शी बातचित केली. अयोध्येत शिवसेना आणि भाजप नेत्यांचं झालेलं भव्य स्वागत पाहून भारावून गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच उत्तर प्रदेशातला हिंदुत्वाचा प्रसार पाहून योगी आदित्यनाथ हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे पंतप्रधान असतील, असा दावा बांगर यांनी केलाय. शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या या दाव्यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा असल्याचं संतोष बांगर यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘अयोध्येचं नाव आधी गाझियाबाद होतं. मात्र आता अयोध्येचं रुपच पालटलं आहे. आम्ही गेलो तेव्हा योगी आदित्यनाथ तेथे आले होते… बाबा है तो सबकुछ है… हेच वाक्य तिथल्या लोकांच्या तोंडी होतं. २०२९ ला योगी आदित्यनाथ हे या हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी बसल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलंय.
Read also
हेही वाचा… “चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा? त्यांचा रुबाब पुणेकर उतरवतील”; धंगेकरांची खोचक टीका
हेही वाचा… ‘माझं मुख्यमंत्रीपद वाचव म्हणून, ठाकरेंनी शिंदे यांच्याकडे केली होती गयावया’
हेही वाचा… “उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.”
हेही वाचा… भाजप नेत्या पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी रेड