पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी महापौर अर्थात ‘बॉस’ला कोणत्याही परिस्थितीत शहरातील ‘कंट्रोल’ आपल्या हातात ठेवायचा आहे. त्यातच आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातील नाराज नगरसेविकेशी राजकीय समझोता झाल्याने पिंपरी विधानसभा मतदार संघातील राजकीय अडथळे दूर करण्यासाठी ‘बॉस’ने पुरेपुर फिल्डिंग लावली आहे.
दरम्यान, महापालिका निवृत्त अधिकारी प्रवीण लडकत यांना करार पद्धतीने सल्लागारपदी नियुक्त करण्याबाबत भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी शिफारस केली होती. याउलट, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी लडकत यांच्या नियुक्तीला विरोध केला होता.
“वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”
मात्र, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध डावलून लडकत यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे कारभारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असूनही अण्णा बनसोडेंच्या पत्राला प्रशासनाने केराची टोपली दाखवली. यामध्ये राष्ट्रवादीच्या माजी महापौराचा हात असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, २०२४ च्या निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभेतून आमदार अण्णा बनसोडे आणि माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यापैकी एकाला तिकीट निश्चित मानले जाते.
कोल्हापूरात महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार; हसन मुश्रीफांचा विश्वास
मात्र, बॉसच्या मर्जीतील आणि भाजपातील नाराज नगरसेविकेची पिंपरीतून राष्ट्रवादीच्या तिकीटावर वर्णी लावण्यासाठी रणनिती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना पदाधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘बॉस’ने पिंपरीतील सुलक्षणा शिलवंत यांचे पद धोक्यात आणले होते. तसेच, विभागीय आयुक्तांकडून शिलवंत यांचे पद रद्द झाले, असा कांगावाही केला होता. आता भाजपाच्या दोन्ही आमदारांवर विविध मुद्यांवर टीका करायची. त्यांना कायम चर्चेत ठेवायचे. ही टीका करण्यासाठी वेगवेगळ्या चेहऱ्यांना पुढे करायचे. त्याद्वारे आमदार अण्णा बनसोडे यांना निष्क्रीय ठरवण्याचा पुरेपुर बंदोबस्त राष्ट्रवादीतील नवनिर्वाचित टीमच्या मदतीने बॉस करीत आहेत. तसेच, शहरातील विविध मुद्यांवर आणि निर्णय प्रक्रियेतून बनसोडे यांना विश्वासात घेतले जात नाही. तसेच, राज्य पातळीवर बनसोडे यांचा प्रभाव कमी करून आगामी निवडणुकीत नवीन चेहरा द्यावा, अशी वातावरण निर्मिती केली जात आहे.
वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर पुण्यात मनसेला गळती; पदधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी खळबळ
प्रवीण लडकत यांच्या नियुक्तीमुळे ‘पॉलिटिकल महाराष्ट्र’ ने काही दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. कारण, बॉसने भाजपा आमदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रवीण लडकत यांच्या नियुक्तीमध्ये बॉसने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे आमदार अण्णा बनसोडे राजकीयदृष्टया साईड कॉर्नर झाले आहेत, वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.
Read also:
- “अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवत आहे”; राऊतांची एसटी आंदोलनावर प्रतिक्रिया
- शरद पवारांच्या घरांवरील हल्ला ठरवून करण्यात आला; दोषींवर कारवाई होणार: गृहमंत्री
- 50 वर्षातील राजकारणाचा काय उपयोग? संन्यास घ्या; नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा
- एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर चपला अन् बांगड्या फेकल्या
- “वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”