सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत यांच्यात सध्या कमालीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राणे कुटुंबीय आणि ठाकरे सरकार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तीन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर टीका केली होती. आणि इथूनच पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे वादास सुरुवात झाली.
टीका करतात आणि कोकणात येऊन पडतात; उदय सामंतांचा नाव न घेता राणेंवर प्रहार
मुंबईमधील नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधिश’ या बंगल्याची अंतर्गत तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. नारायण राणे यांच्यासाठी ही कदाचित वाईट बातमी असली तरी सिंधुदुर्गातून राणेंसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
नारायण राणेंना मुंबई महापालिकेचा दणका; अनाधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेची नोटीस
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांची जिल्हा बँकेच्या स्वीकृत तज्ञ संचालकपदी आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर दुसरे सदस्य म्हणून प्रकाश मोर्ये यांना संधी देण्यात आली आहे. आज ही निवड प्रकीया झाली. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी स्वीकृत नगरसेवक निवड करण्यात आली.
कोर्लईमध्ये भाजप- शिवसेनेत राडा; सोमय्या येताच गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण
यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गजानन गावडे, महेश सारंग, बाबा परब, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण नीता राणे, व्हीकटर डाट्स, समीर सावंत, रवी मंडगावकर, सुशांत नाईक, आत्माराम ओटवणेकर, विध्याप्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी आदी संचालक या बैठकीस उपस्थित होते. आमदार नितेश राणेंच्या निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे आणि प्रकाश मोर्ये यांचे अभिनंदन केले.
Read also:
- मी तर भाजीवाला माणूस, त्या चंद्रकांत पाटलांनी…; छगन भुजबळांनी काढला चिमटा
- कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का; चार माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण
- शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा
- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे आंदोलन; भाडोत्री लोकांचा एक फ्लॉप शो !
- राज्यात संघर्ष, मात्र स्थानिक पातळीवर एकवटले; ‘या’ शहरात भाजपने केली शिवसेनेसोबत दोस्ती