औरंगाबाद : राज्यात एमआयएमला भाजपची बी टीम म्हणून विरोधी पक्षांंकडून सातत्याने टीका केली जात आहे. यातच ज्याठिकाणी एमआयएमचे उभे राहतात, त्याठिकाणी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे उमेदवार पराभूत होतात. अन् त्याचा फायदा भाजपला होतो. अशी टिका एमआयएमवर केली जात आहे. त्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे.
“महात्मा गांधींच्या विचारांची हत्या पंडीत नेहरूंकडून”, सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त व्यक्तव्य
गेल्या अनेक वर्षापासून राजकीय पक्ष मुस्लिम मतं ही आपली प्रापर्टी समजत आहेत. परंतु ही प्रापर्टी आमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. तसेच त्यांना जर असं वाटत असेल की एमआयएममुळे भाजपला मदत होत असेल तर त्यांना माझी खुली ऑफर आहे की, आम्ही तुमच्यासोबत युती करण्यास तयार आहे. तुम्ही आमच्या नेत्यांशी बोला. आपण भाजपविरोधात सोबत लढू. असं जलील यांनी सांगितलं आहे.
“सत्यजीत तांबेंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरा”, भाजपकडून कार्यकर्त्यांना आदेश
अलिकडेच वंचित आणि शिवसेनेची युती मुंबई येेथील आंबेडकर भवनात झाली आहे. यातच आता राज्यातील घटक पक्ष महाविकास आघाडीसोबत भाजपच्याविरोधात जाण्यासाठी इच्छुक आहेत. यावर खासदार इम्तियाज जलील यांना विचारले असता. त्यांनी महाविकास आघाडीला युती संदर्भात खुली ऑफर दिली आहे.
दरम्यान, वंचित आणि शिवसेनेची युती झाल्याने राज्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी आपापली भूमिका अद्यापही जाहीर केली नाही. परंतु आघाडीतील पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांना संभाळावं अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्यातच आता एमआयएमची महाविकास आघाडीसोबत युती झाल्यास भाजपविरोधात मोठी ताकद उभी राहण्याची शक्यता आहे.
Read also
- सत्यजीत तांबेंचा भाजप कनेक्शन, थेट भाजपच्या कार्यालयात जाऊन घेतली जिल्हाध्यक्षांची भेट
- “पोटनिवडणुकांमध्ये मतं कमी पडली तर तिकीट कापलं म्हणून समजा”, भाजपच्या माजी खासदाराचा नगरसेवकांना इशारा
- “तर त्यांनी हा खटला लवकर दाखल करावा,” इम्तियाज जलील यांचे सुभाष देसाईंवर धक्कादायक आरोप
- “एमआयएमशी युती झाल्यास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार का?” भाजप नेत्याचा सवाल
- अद्वय हिरेंच्या प्रवेशाबाबत भुसेंची प्रतिक्रिया म्हणाले, “ते माझ्याविरोधात उभे राहणार मग..”