मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टिका केली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणांवरून सुजात आंबेकर यांनी मनसेवर निशाणा साधला होता. आता त्यावर हिंदु महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
एकही कागद, तक्रार नाही, नुसते हवेतील आरोप; जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, सुशिक्षित असून चालत नाही सुजाण सुद्धा असावं लागतं. अर्थात पुढारी बनणे हे अत्यंत जबाबदारीचे काम त्यासाठी तुम्ही फक्त उच्चशिक्षित असून चालत नाही. इतरही गुण आत्मसात करणे महत्वाचे आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जातिभेद,उच्च-नीच मानणारे युवक आजही आहेत हे बघून मान खाली जाते, असा टोला त्यांनी लगावला आहे.
गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कामगारांकडून पैसे गोळा केले; परिवहन मंत्र्यांचा धक्कादायक आरोप
नावातच जात शब्द असलेल्या सुजातकडून शहाणपणाची अपेक्षा नाही. दंगली ब्राम्हण घडवतात. हे म्हणण्याआधी निदान वडिलांच मत तरी घ्यायचं होतं. काल परवा राम नवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कोणी केल्या? अफगाणिस्तानमधील बौद्ध प्रतिमची तोडफोड कोणी केली ? हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी आज सुद्धा आमचा दलित बंदू काम करत आहे. हेच त्यांना सहन होत नाही. ये याच रागातून हे बोलले गेले आहे. अशी टिका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.
ईडीची धमकी देणाऱ्या भाजपने कोल्हापूर निवडणुकीत वाटले पैसे ; विविध भागात ‘लक्ष्मी दर्शनाने’ खळबळ
दरम्यान, दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय ब्राम्हण असतात आणि रस्त्यावर उतरणारे बहुजन मुलं असतात. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर स्वत: च्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवा. स्वत:च्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असा हल्लाबोल सुजात आंबेडकर यांनी केला होता. त्यावर त्यांच्यावर चौफेर टिका करण्यात आली होती.
Read also:
- कोल्हापुर उत्तरमध्ये मतदान केंद्रावरच मोठा राडा! भाजप, काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले
- “आघाडीला तोंड दाखवयाला जागा राहिली नाही”; जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया
- प्रवीण दरेकर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा! अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर
- करारा जवाब मिलेगा! ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेचं थेट काश्मीरमध्ये प्रेक्षपण
- पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा? पालिकेच्या नवीन धोरणावरून शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं